भरणेंच्या फोटोवरून शिक्षक आणि माजी मंत्र्याच्या मुलामध्ये वाद - Teacher scolds former minister's son for asking why Dattatreya Bharane's photo was posted in group | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

भरणेंच्या फोटोवरून शिक्षक आणि माजी मंत्र्याच्या मुलामध्ये वाद

डॉ. संदेश शहा 
सोमवार, 28 जून 2021

माजी मंत्री पाटील यांचे चिंरजीव राजवर्धन पाटील यांनाच संबंधित शिक्षकाने अरेरावीची भाषा वापरली आहे. 

इंदापूर : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शाळेतील एका शिक्षकाने ग्रुपवर सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्याबाबतचा जाब विचारणारे संस्थेचे अध्यक्ष पाटील यांचे चिरंजीव तथा नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांना संबंधित शिक्षकाने अरेरावीची, एकेरी भाषा वापरली. त्या दोघांच्या संभाषणाची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. (Teacher scolds former minister's son for asking why Dattatreya Bharane's photo was posted in group)
 
इंदापूर तालुका शिक्षण संस्थेशी संबंधित असलेल्या एका व्हाटस अप ग्रुपवर एका शिक्षकाने राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा फोटो टाकला आहे. तो का टाकला, याची विचारणा करणारे माजी मंत्री पाटील यांचे चिंरजीव राजवर्धन पाटील यांनाच संबंधित शिक्षकाने अरेरावीची भाषा वापरली आहे. 

हेही वाचा : वडेट्टीवार, थोडी वाट पाहा; तुम्हाला मोठी संधी मिळणार आहे 

राजवर्धन यांनी संबंधित शिक्षकास ‘आपण संस्थेत काम करत आहात. आपण दत्तात्रेय भरणे यांचा फोटो ग्रुपला का टाकला,’ असा जाब विचारला. त्या वेळी संबंधित शिक्षकाने ‘तू झोपेत आहेस का जागा आहे,’ अशी विचारणा करत ‘तू माझ्याकडे शाळेत ये,’ असे एकेरी भाषेत राजवर्धन पाटील यांना सुनावले. त्यावर ‘आपण काय बोलत आहात,’ असे राजवर्धन पाटील विचार असतानाच ‘मला दोन नातवे आहेत, धमकी देऊ नको,’ असेही त्या शिक्षकाने पाटील यांना सुनावले. ‘तुम्ही मला भेटायला या’, असे सांगत असतानाही ‘तू मला येऊन भेट’, असे उलट उत्तर संबंधित शिक्षकाने राजवर्धन यांना दिल्याचे दिसत आहे.

दरम्यान, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक संस्थेत शिक्षकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही. संस्थेच्या अध्यक्षांनी जाब विचारला तर ठीक आहे. संस्थेत पदावर नसलेल्या त्यांच्या मुलास जाब विचारण्याचा काही अधिकार नाही, असे काहींचे म्हणणे आहे.

ज्या संस्थेत आपण काम करतो, त्या संस्था मालकाच्या मुलास शिक्षकाने अशोभनीय भाषा वापरली आहे. एक शिष्टाचार म्हणून त्या शिक्षकाने योग्य भाषा वापरणे गरजेचे होते, अशी राजकीय चर्चा इंदापूर तालुक्यात सोशल मीडियातून रंगली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख