अजितदादा यांच्या गावातील तलाठी निलंबित  - Talathi in Ajitdada village suspended | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादा यांच्या गावातील तलाठी निलंबित 

कल्याण पाचांगणे
बुधवार, 3 मार्च 2021

महसुल विभागाने संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली.

बारामती : काटेवाडी (ता.बारामती) गावातील तलाठ्याने विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच घेतल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने महसुल विभागाने संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली. महेश मोटे हे कारवाई झालेल्या तलाठ्याचे नाव असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. 

दरम्यान, काटेवाडी येथील शेतकरी विकास धायगुडे हे विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी गावातील तलाठी महेश मोटे यांच्याकडे गेले असता त्यांनी २० हजारांची मागणी केली. 

जयंत पाटलांनी धूर्तपणे केलेले करेक्ट कार्यक्रम 

दरम्यानच्या कालावधीत त्यापैकी १० हजार रुपये संबंधित तलाठ्याला देत असतानाच्या प्रसंगाचा व्हीडीओ शेतकरी धायगुडे यांनी काढून घेतला. या व्हीडीओमध्ये तलाठी पैसे मोजताना दिसत आहेत. तसेच मला वरही पैसे द्यावे लागतात, पण ठीक आहे, मी करून घेतो, अशी चर्चा त्यात एकू येत आहे. हा व्हीडीअो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तलाठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.  या प्राप्त स्थितीचा विचार करून तहसिलदार विजय पाटील यांनी प्रथमदर्शनी मोटे कारवाईस पात्र असल्याचे स्पष्ट केले. 

पाटील म्हणाले, ''काटेवाडी येथील तलाठ्याचा व्हायरल झालेल्या व्हीडीओची प्राथमिक तपासणी केल्यावर यामध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत. नोंदीच्या बाबत जे कामकाज होणार होते, प्रथमदर्शनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणुक नियमाचा भंग केल्याचे दिसत आहे. त्यामुळे तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करत विभागीय चौकशीचा प्रस्ताव प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले. 

हे ही वाचा...

काय सांगता? संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर पुणे पोलिसांनी केले हे `महत्वाचे` काम! 

पुणे : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी राजकीय वर्तुळाचे लक्ष पुणे पोलिसांकडे लागलेले आहे. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर पुणे पोलिसांचा तपास वेगाने सुरू होईल आणि लवकरच या प्रकरणातील गूढ पडदा दूर होईल, अशी अपेक्षा होती.

फडणवीस, चंद्रकांतदादा, चित्रा वाघ यांच्यावर पुणे पोलिस गु्न्हा दाखल करणार?
 

मृत्यूच्या दिवशी पूजासोबत असलेले अरुण राठोड, चव्हाण या दोन व्यक्तींचा पुन्हा जबाब घेणे, आॅडिओ क्लिपमधील आवाजाचा शोध घेणे, पूजा चव्हाण हिच्या मोबाईल आणि लॅपटाॅपमधील बाबींचा तपास करणे अशी कामे राठोड यांच्य राजीनाम्यानंतर वेगाने होतील, असा अंदाज असताना पुणे पोलिसांनी त्यातील एक काम केले असल्याचे समजते आहे. ते म्हणजे पूजाचा अंतिम शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला असून त्यात डोक्याला आणि मणक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्यावर शिक्कामोर्तब या अहवालात करण्यात आले आहे. यातील दुसरे काम म्हणजे या प्रकरणावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उत्तर न देता ते पत्रकार परिषदेतून उठून गेले. ही दोन कामे प्रत्यक्षरित्या झाल्याचे गेल्या दोन दिवसांत दिसून आले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख