छत्रपती कारखान्याच्या कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार भोवला 

निवडणुकीच्या प्रचारात कामांचा लेखाजोखा मांडणाऱ्या छत्रपती कारखान्याच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची वेळ आली आहे.
Suspension of Chhatrapati Sugar Factory employee for misconduct
Suspension of Chhatrapati Sugar Factory employee for misconduct

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील शेतकी विभागात काम करणाऱ्या कर्मचारी वसंत पांडुरंग शिंदे यांना ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार चांगला भोवला आहे.

अकोले येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर सभेत बोलताना "लोकांचा आडसाली ऊस राहिला आहे. पण, तुमचा खोडवा अगोदर तोडून नेला आहे,' असा गौप्यस्फोट केल्याने कारखाना प्रशासनाने तातडीने कारवाई करत वसंत शिंदे यांना निलंबित केले. 

सध्या इंदापूर तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. मते मिळविण्यासाठी उमेदवार केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आहेत. पण, निवडणुकीच्या प्रचारात कामांचा लेखाजोखा मांडणाऱ्या छत्रपती कारखान्याच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची वेळ आली आहे. 

अकोले ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अंकलेश्‍वर ग्रामविकास पॅनेलमधून प्रभाग- 4 मध्ये छत्रपती कारखान्याच्या शेतकी विभागात काम करणारे वसंत पांडुरंग शिंदे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. शिंदे यांनी गावात मंदिरातील प्रचार सभेमध्ये भाषण करताना विकासावर बोलत होते. 

शिंदे म्हणाले की, लोकांचा आडसाली ऊस राहिला आहे (तोडणी अद्याप झाली नाही). मात्र, तुमचे खोडव्यासहित हाणले (खोडवा ऊस तोडला आहे) असल्याचे सांगितले. 

याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाला फोन करून सभासदांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, ऊस तोडणीबाबत दुजाभाव होत असल्याचे सांगितले. त्यानंतर कारखान्याने तातडीने शिंदे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून कारखान्याच्या शिस्तीचे पालन केले नाही. तसेच, गैरवर्तन केल्याबद्दल पुढील आदेश होईपर्यंत कारखान्याच्या सेवेमधून निलंबन केल्याचे पत्र कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. एम. अनारसे यांनी शिंदे यांना दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com