ही बदनामी एका शाळेची नाही तर...चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची! 

आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात या शाळेच्या गुणवत्तेची चर्चा होत आहे.
 Suresh Dhas .jpg
Suresh Dhas .jpg

पुणे : महाराष्ट्र राज्यातील गुणवत्तेसाठी अग्रेसर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा (Wablewadi school) परिषद शाळेची काही लोकांनी नाहक बदनामी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाबळेवाडी शाळेबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्याला कंटाळून मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे, जयसिंग नऱ्हे व एकनाथ खैरे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. उर्वरित १० शिक्षकही राजीनाम्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या घटनेची दखल घेऊन शाळेची बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई, अशी मागणी धस यांनी केली. (Suresh Dhas said regarding Wablewadi school) 

शिक्षकांनी व्यथीत होऊ नये असे, आवाहन करत शिक्षकांना धस यांनी पाठींबा दर्शविला आहे. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात या शाळेच्या गुणवत्तेची चर्चा होत आहे. जगभरातील अनेक देशांनी या शाळेशी सामंजस्य करार केले आहेत. या ठिकाणच्या ग्रामस्थांनी गावची जत्रा बंद करून कोट्यवधी रुपयांची जमीन शाळेला दिलेली आहे. हे संपूर्ण गाव व पालक या शिक्षकांच्या पाठीशी असताना शाळेशी कसलाही संबंध नसणाऱ्या बाहेरील व्यक्तीने शाळेची बदनामी केल्यामुळे व्यथित होऊन या शाळेचे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक दत्तात्रय वारे व इतर दोन शिक्षकांनी राजीनामे दिले आहेत. तसेच तालुक्यातील अनेक शिक्षक राजीनाम्याच्या पावित्र्यात आहेत. या शाळेकडे पाहून राज्यातील अनेक शिक्षक चांगले काम करत आहेत, त्यामुळे ही बदनामी केवळ एका शाळेची नाही तर राज्यातील चांगले काम करणाऱ्या सर्व शिक्षकांची असल्याचे धस म्हणाले.

दरम्यान,  शिरूर तालुक्यातील कुणाचा तरी इगो हर्ट झाला असावा. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर राज्यात १२०० शाळा उभ्या करण्याचे जाहीर केल्याने मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशानेच वाबळेवाडी शाळेवर शिंतोडे उडविले जात असल्याचा आरोप प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे सरचिटणीस केशवराव जाधव यांनी केला होता. 

या प्रकरणात आम्ही वारे गुरुजी, वाबळेवाडी शाळा आणि ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत. आम्ही पुढील दोन दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवारांना समक्ष भेटून वाबळेवाडी शाळेसाठी लढणार असल्याचे जाधव व बारामती तालुकाध्यक्ष हनुमंतराव शिंदे यांनी जाहीर केले होते. प्रशासनाने तत्काळ या प्रकरणी दखल घेऊन कार्यवाही न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही जाधव यांनी दिला होता.

गेल्या काही दिवसांपासून वाबळेवाडी शाळेबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्याला कंटाळून मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे, जयसिंग नऱ्हे व एकनाथ खैरे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. उर्वरित १० शिक्षकही राजीनाम्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी बारामती येथील शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी मुख्याध्यापक वारे, वाबळेवाडी ग्रामस्थ यांना भेटले. वाबळेवाडी शाळेवर होत असलेल्या चिखलफेकीबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे या शिष्टमंडळाने सांगितले होते.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com