अजब निर्णय : पीपीई किट घालून द्यावी लागणार MPSC ची परीक्षा 

सध्याचंतापमान पाहता विद्यार्थ्यांनी पेपर सोडावयचा की घाम पुसत बसायचे? असा प्रश्‍न पालक आणि परीक्षार्थींकडून विचारला जात आहे.
Strange decision: MPSC exam will have to be given wearing the PPE kit
Strange decision: MPSC exam will have to be given wearing the PPE kit

सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा आता 21 मार्च रोजी होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पीपीई किट दिले जाणार आहे. दोन सत्रात होणाऱ्या परीक्षेसाठी दोन पीपीई किट दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक असलेल्या पीपीई किट जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी गुरुवारी (ता. 18 मार्च) दिली. 

सोलापुरात उन्हाळा आणि कडक उन्हाळा असे दोनच हंगाम मानले जातात. सध्या सोलापूरच्या तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढतच असताना विद्यार्थ्यांना पीपीई किट घालून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी लागणार आहे. सोलापूर शहरात 22 परीक्षा केंद्र असणार आहेत. या केंद्रावरून 8 हजार 880 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

दरम्यान, सोलापूरचं तापमान पाहता विद्यार्थ्यांनी पेपर सोडावयचा की घाम पुसत बसायचे? असा प्रश्‍न पालक आणि परीक्षार्थींकडून विचारला जात आहे. सोलापूरचं तापमान सध्या 35 अंशांच्या पुढेच आहे, अशावेळी पीपीई किट घालून पेपर लिहिणे हे परीक्षार्थींपुढे दिव्यच असणार आहे. 

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी या परीक्षेदरम्यान केली जाणार आहे. सुमारे 8 हजार 880 विद्यार्थ्यांसाठी सोलापुरातील 22 शाळांमधील 370 वर्गखोल्या असणार आहेत. या वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 605 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

परीक्षा केंद्र परिसरातील बंदोबस्तासाठी 110 पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआरद्वारे कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना देखील पीपीई किट घालूनच परीक्षेचे कामकाज पहावे लागणार आहे. 

परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान मोजणे, विद्यार्थ्यांची झाडाझडती घेणे यासाठी दिल्लीच्या एम. एस. इनोवेशन कंपनीची नियुक्तीही करण्यात आली आहे. सोलापूर शहरात या परीक्षेसाठी अण्णाप्पा काडादी हायस्कूल, संगमेश्वर महाविद्यालय, एसइएस पॉलीटेक्‍निक, दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल, डी. बी. एच. सोनी महाविद्यालय, शांती इंग्लिश मीडियम स्कूल, सिद्धेश्वर बाल मंदिर, सिद्धेश्वर प्रशाला, नागेश करजगी ऑर्चीड कॉलेज, एस. व्ही. सी. एस. हायस्कूल, व्हीव्हीपी पॉलिटेक्‍निक, सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्‍निक, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, हिंदुस्थान कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, एस. व्ही. सी. एस. हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज, कुचन प्रशाला, दयानंद महाविद्यालय, एस. के. बिराजदार प्रशाला, सौ. भु. म. पुल्ली कन्या प्रशाला, सिद्धेश्वर कन्या प्रशाला या शाळा महाविद्यालयांत 22 केंद्र असणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com