स्वीकृत नगरसेवकपदी मर्जीतील व्यक्तीची वर्णी लावण्यासाठी कारभाऱ्यांचा आटापिटा

माजी मंत्री बाळा भेगडे यांचे आळंदीतील उजवे हात समजले जाणारे आणि पालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते पांडुरंग वहिले यांनाही त्यांच्या मर्जीतील व्यक्तीची स्वीकृतपदावर वर्णी लावायची आहे.
Special meeting on March 24 for the election of nominated corporator in Alandi
Special meeting on March 24 for the election of nominated corporator in Alandi

आळंदी (जि. पुणे) : आळंदी नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य संदीप रासकर यांनी राजीनामा दिल्याने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी ता.24 मार्च रोजी नवा स्वीकृत सदस्य निवडीसाठी पालिकेत विशेष सभा बोलावली आहे. दरम्यान, नऊ महिन्यांवर येवून ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकीची गणिते लक्षात ठेवून स्वीकृत सदस्याची निवड केली जाणार आहे. यामध्ये ब्राम्हण समाज किंवा वारकरी संप्रदायातील व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार असल्याची चर्चा आहे. 

स्वीकृत सदस्य रासकर यांनी दिलेला रानीनामा 1 फेब्रुवारी रोजी मंजूर झाला. भारतीय जनता पक्षाकडून रासकर यांनी निवड झाली होती. मात्र, त्यांनी राजीनामा देण्याच्या अगोदरच काही महिन्यांपासून पुढील स्वीकृत सदस्य कोण? याचीच चर्चा जादा झाली. नगरपालिकेत भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. भाजपकडे दहा, शिवसेनेकडे सहा आणि दोन अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. याशिवाय नगराध्यक्षही भाजपचेच आहेत. राजीनामा दिलेले रासकर आणि भाजपतील त्यांचे काही सहकारी नगरसेवक हे ब्राम्हण समाज आणि वारकरी संप्रदायातील व्यक्तींच्या निवडीसाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे काहींची नावे नगरसेवकांकडून चर्चिली जात आहे. तरी काही स्वःहून इच्छूक आहेत. 

ब्राम्हण समाजाला गेल्या दहा वर्षांत पालिकेत प्रतिनिधित्व मिळाले नाही. यामुळे त्यांच्याकडून गिरीष तुर्की, संजय प्रसादे, ऍड आकाश जोशी, आनंद जोशी यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. याचबरोबर वारकरी संप्रदायातून पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. याशिवाय भाजपचे कार्यकर्ते ऍड सचिन काळे, बंडू काळे, भागवत आवटे हेही इच्छूक आहेत. माजी मंत्री बाळा भेगडे यांचे आळंदीतील उजवे हात समजले जाणारे आणि पालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते पांडुरंग वहिले यांनाही त्यांच्या मर्जीतील व्यक्तीची स्वीकृतपदावर वर्णी लावायची आहे. 

इच्छूक अनेक असले तरी भाजपकडून जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आणि गटनेते यांची मर्जी कोणावर राहील, त्यांच्याच गळ्यात स्वीकृत पदाची माळ पडणार, हे निश्‍चित आहे. सध्या तरी संदीप रासकर आणि त्यांच्या पत्नी राणी रासकर दोघेही पती-पत्नी एकाच वेळी स्वीकृत सदस्य होते. संदीप रासकर यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागेवर कोण येणार? याची उत्सुकता आहे. 

दरम्यान, बैठकीच्या किमान चोवीस तास अगोदर ता. 23 मार्चपर्यंत गटप्रमुखाने प्रस्तावित सदस्यांचा अर्ज भरणे. त्यानंतर ता. 24 मार्च रोजी नगराध्यक्ष तथा पीठासिन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता स्वीकृत सदस्याच्या निवडीची घोषणा केली जाणार आहे. 

संदीप रासकर आगामी निवडणूक लढवणार 

अवघ्या नऊ महिन्यांवर येवून ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवून आपापल्या प्रभागातील कार्यकर्त्याला संधी देण्याच्या प्रयत्नांत काही नगरसेवक आहेत. राजीनामा देणारे रासकर यांना आळंदीत निवडणूक लढवायची असल्याने तेही त्यांच्याच विचाराचा माणूस बसविण्याच्या तयारीत आहेत. गटनेते वहिले यांच्या कुटुंबातील सदस्य आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष भागवत आवटे हेही इच्छूक आहेत. माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या संपर्कात असल्याने स्वीकृत सदस्याची माळ नेमकी कुणाच्या गटाला मिळणार? याकडे आळंदीकरांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com