सरपंचाने इशारा देताच पुणे झेडपीचे निधी देण्याचे आश्‍वासन 

त्या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे (ग्रामीण) उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी संबंधित निधीच्या फाइलची पाहणी करून तत्काळ सही केली.
As soon as the Sarpanch warned of a hunger strike, Pune ZP gave funds
As soon as the Sarpanch warned of a hunger strike, Pune ZP gave funds

लोणी काळभोर (जि. पुणे) : जिल्हा परिषद स्तरावरून मिळणारा विकास शुल्क निधी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही मिळत नसल्याने हवेली तालुक्‍यातील कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी सोमवारी (ता. 22 फेब्रुवारी) पुण्यात जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र, उपोषणाला बसण्याच्या अगोदरच झेडपीचे उपमुख्यकार्यकारी (ग्रामीण) अधिकारी दोन दिवसांत निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण मागे घेत असल्याचे गौरी गायकवाड यांनी जाहीर केले. 

कदमवाकवस्ती येथील ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. जिल्हा स्तरावरून मिळणारे विकास शुल्क व दंडाची रक्कम 1 कोटी रुपये, तसेच 15 व्या वित्त आयोगानुसार 66 लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीमध्ये वर्ग होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार केला होता. मात्र, पत्रव्यवहार करून देखील जिल्हा परिषदेतील अधिकारी त्याची दखल घेत नव्हते. त्यासाठी सोमवारी (ता. 22 फेब्रुवारी) उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच गायकवाड यांनी दिला होता. 

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्यानुसार सरपंच गौरी गायकवाड ह्या आज (ता. 22 फेब्रुवारी) उपोषण करण्यासाठी गेल्या. त्या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे (ग्रामीण) उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी संबंधित निधीच्या फाइलची पाहणी करून तत्काळ सही केली. येत्या दोन दिवसांत ग्रामपंचायतीच्या खात्यावर निधी जमा केला जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेतल्याचे गौरी गायकवाड यांनी संगितले. 

हेही वाचा : बाबूराव पाचर्णेंसाठी आमची महत्वकांक्षा दूर ठेवणार; कंदांनीही भूमिका जाहीर करावी 

शिक्रापूर (जि. पुणे) : विधानसभेच्या सहा निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात लढून दोन वेळा विधानसभेत पोचलेले आमचे नेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सातव्यांदा निवडणूक लढवून आमदार व्हावे, हेच माझ्यासारख्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांचे स्वप्न आहे. आगामी निवडणुकीत आम्हाला (शिरूर भाजपला) 41 हजार मताधिक्‍याचा वचपा काढायचा आहे. त्यामुळे मी व आमच्या पक्षातील इतर इच्छुक आपल्या महत्वकांक्षा पाचर्णेंसाठी दूर ठेवणार आहोत, असे क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी जाहीर केले. 

दरम्यान, शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला जागा दाखवून देणारच आहोत. मात्र, तत्पूर्वी प्रदीप कंद यांनी त्यांची पक्षीय भूमिका जाहीर करावी, असे आव्हान पाचंगे यांनी कंद यांना दिले आहे. 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कंद यांनी मात्र याबाबत मौन बाळगल्याने भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच कंद हे माजी आमदार विलास लांडे यांच्याशी बोलून सांगतो म्हटल्याने तर या गोंधळात आणखी भर पडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर पाचर्णे यांनी सातव्यांदा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने कंद अस्वस्थ असल्याचेही बोलले गेले. 

आगामी विधानसभेसाठी पाचर्णेंबरोबरच भाजपतील आणखी काही जण इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रमुख इच्छुकांमधील भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सर्व इच्छुकांच्या वतीने आपली भूमिका जाहीर करीत आगामी निवडणुकीत आम्ही पाचर्णे यांच्या पाठीशी राहून आपल्या इच्छा दूर ठेवत असल्याचे जाहीर केले. या शिवाय पाचर्णेंचा 41 हजार मतांनी झालेला पराभवही जिव्हारी लागल्याचे सांगत पुढील निवडणुकीत त्याचाही वचपा काढण्याचा इरादाही बोलून दाखवला. त्याची सुरुवात शिरुर नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीला दाखवून देत करणार असल्याचे स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com