स्वतःला नेते म्हणविणाऱ्यांनी पुढे यावे : पोलिस अधीक्षक संदीप पाटील - So Called Leaders should Come Forward to Convince people for Corona Safety | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

स्वतःला नेते म्हणविणाऱ्यांनी पुढे यावे : पोलिस अधीक्षक संदीप पाटील

दत्ता म्हसकर
मंगळवार, 19 मे 2020

लॉक डाऊन शिथिल केला म्हणजे कोरोना गेला असे कोणी समजू नये उलट आता तुम्ही कामासाठी बाहेर पडत असल्याने अधिक सतर्क राहिले पाहिजे. कोरोना कोणाच्याही माध्यमातून येण्याची शक्यता असल्याने निष्काळजीपणा दाखवू नका असे आवाहन पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले

जुन्नर : लॉक डाऊन शिथिलतेच्या काळात नागरिक व प्रशासन यांना सहकार्य करण्यासाठी स्वतःला नेते म्हणविणाऱ्यांनी पुढे आले पाहिजे असे मत  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी येथे व्यक्त केले. रमजानच्या निमित्ताने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी विकास दांगट, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे,मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर, पोलीस व महसूल अधिकारी व हिंदू मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ''लॉक डाऊन शिथिल केला म्हणजे कोरोना गेला असे कोणी समजू नये उलट आता तुम्ही कामासाठी बाहेर पडत असल्याने अधिक सतर्क राहिले पाहिजे. कोरोना कोणाच्याही माध्यमातून येण्याची शक्यता असल्याने निष्काळजीपणा दाखवू नका. फिजिकल डिस्टंन्सींगचे पालन करा. सॅनिटायझर मास्कचा वापर करा व कोरोनाला दूर ठेवा. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास परिसरातील नागरिकांनी माहिती देण्यास पुढे यावे. लक्षणे आढळून आल्यास तपासणी करून घ्या''

प्रांताधिकारी जितेंद्र डुडी, नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक जमीर कागदी, म.पां.काजळे यांनी आपल्या सूचना मांडल्या. पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन विलास कडलग यांनी केले. दीपाली खन्ना यांनी आभार मानले. जुन्नर-आंबेगाव तालुक्यात सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चांगले काम केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या चेक पोस्ट पॅटर्न जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. यावेळी त्यांचे सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख