लोकांना वाटतंय अजून मीच खासदार आहे

खासदार असताना जनता दरबाराची सुरु केलेली प्रथा खासदारकी नसली, तरी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुरुच ठेवली आहे.
 Shivajirao Adhalrao Patil .jpg
Shivajirao Adhalrao Patil .jpg

पिंपरी : खासदार असताना जनता दरबाराची सुरु केलेली प्रथा खासदारकी नसली, तरी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुरुच ठेवली आहे. गेल्या १७ वर्षाचा त्यांचा हा उपक्रम म्हणजे आता त्यांची सिस्टीम झाली आहे. त्याअंतर्गत ते दर रविवारी आपल्या लांडेवाडी (ता. मंचर, जि. पुणे) येथील निवासस्थानी जनतेला भेटत आहेत.

आढळराव यांनी शिरूरमधून ( जि. पुणे) शिवसेनेकडून खासदारकीची हॅटट्रिक केलेली आहे. २००४ मध्ये ते प्रथम निवडून आले. त्याच वर्षी त्यांनी जनता दरबार सुरु केला. त्याअंतर्गत ते दर रविवारी लांडेवाडी येथील आपल्या निवासस्थानी भेटून लोकांच्या अडीअडचणी सोडवू लागले. त्यांच्या मतदारसंघात पिंपरी-चिंचवडमधील भोसरी, तर पुण्यातील हडपसर हा विधानसभा मतदारसंघ येतो. भोसरीकरांसाठी त्यांनी आठवड्यातील गुरूवारचा दिवस दिला. कारण उद्योगनगरीत त्या दिवशी कामगारांना सुटी असते. तर, हडपसरवासियांसाठी ते पुण्यातील त्यांच्या कार्यालयात भेटू लागले.

सध्या आढळराव खासदार नाहीत. तरीही त्यांचा लांडेवाडीतील आठवड्याचा जनता दरबार सुरुच आहे. गेल्यावर्षी कोरोनाने जगच थांबले होते. त्यामुळे या दरबारालाही ब्रेक लागला होता. पण, तो पुन्हा यावर्षी सुरु झाला आहे. नुकताच (ता.४ एप्रिल) तो झाला. त्यात जुन्नर तालुक्यातील कुरण गावातील केटीवेअर बंधाऱ्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर लगेचच पत्रव्यवहार केला गेला. तर, या गावातील रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सर्व्हेक्षण करण्यास सांगितले. 

आढळराव आणि शिरूरवासियांना आता या उपक्रमाची  सवयच जडलेली आहे. त्यामुळे खासदार नसूनही ते दोघे एकमेकांना भेटतच आहेत. त्याखेरीजही तातडीचे कामे घेऊन मतदार त्याच्या निवासस्थानी इतर दिवशीही येतच असतात, असे आढळरावांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश काजळे यांनी सांगितले.

विकासकामांखेरीज वैयक्तिक प्रश्न घेऊनही लोकं भेटायला येतात, असे ते म्हणाले. आठवड्याच्या दरबारात महसूल, पुनर्वसन, पाणी, एमएसईबीसंदर्भातील तक्रारी अधिक असतात अशी माहिती त्यांनी दिली. आता विकासकामांसाठी खासदार निधी नसला, तरी जिल्हा नियोजन मंडळातून तो आणला जातो. ग्रामविकास मंत्र्यांच्या विभागातून दोन कोटी रुपये तो आणल्याचे त्यांनी सांगितले.

एका पराभवामुळे ही सिस्टीम मोडणार नाही, असे स्पष्ट करताना ती पुढेही सुरुच राहील, असे आढळराव यांनी यासंदर्भात 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. खासदार नसतानाही जनता दरबार सुरु ठेवण्यामागील कारणमिमांसा करताना ते म्हणाले, खासदार असणे महत्वाचे नाही, तर लोकांची कामे होणे महत्वाचे आहे. त्यासाठी खासदार असणेच जरुरीचे नाही.

दुसरे म्हणजे लोकांनाही आता सवय झाली आहे की लांडेवाडीला गेले की काम होते. ही सिस्टीत तथा परंपरा झाली आहे. लोकांनाही वाटत नाही, मी खासदार नाही. उद्धवजी मुख्यमंत्री असल्याने कामे होण्यात आणि निधी आणण्यातही अडचण येत नाही. खासदार असल्यासारखाच अद्यापही आपला संचार मतदारसंघात सुरुच आहे.  

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com