शिवसेना ही राष्ट्रवादीला अंगावर आलेली पाल वाटते काय? आढळरावांचा सवाल 

मुख्यमंत्र्यांचा फोटो टाळण्याची कृती अत्यंत चुकीची आहे.
Shivajirao Adhalrao criticizes NCP for omitting CM's photo
Shivajirao Adhalrao criticizes NCP for omitting CM's photo

शिरूर : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, या मदतीची राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अधिक जाहिरातबाजी होत आहे. हे एकवेळ समजण्यासारखे असले; तरी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकताना मुख्यमंत्र्यांचा फोटो टाळण्याची कृती अत्यंत चुकीची आहे, अशा शब्दांत शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना ही राष्ट्रवादीला अंगावर आलेली पाल वाटते काय, असा सवाल त्यांनी केला. 

आघाडी धर्माचे पालन करीत अत्यंत संयमाने, शांततेने आणि निरपेक्षपणे मुख्यमंत्री ठाकरे हे कारभार करतात. शेतकरीहिताचे निर्णय घेत असताना त्यात राजकारण आणले जाऊ नये, असे आवाहन आढळराव पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिलेल्या दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल करताना राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांचा फोटो टाळला जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

ते म्हणाले की, महाआघाडी म्हणताना असे होता कामा नये. मुख्यमंत्री कुणाशीही, कसलाही भेदभाव करीत नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसमधील नेत्यांना अधिकाधिक जपतात. तरीही असे होत असेल तर ते चुकीचे आहे. भविष्यातील आघाडीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्याबाबतचे सर्वाधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच आहेत. तरीही स्वबळाची तयारी असावी; म्हणून पक्षसंघटन मजबूत करण्यावर आम्ही स्थानिक पातळीवर भर देत आहोत. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत पत्रकारांनी छेडला असता, त्यांच्याविषयी न बोललेलेच बरे, असे म्हणत, दीड वर्षात त्यांनी मंजूर केलेले कुठलेही एखादे काम दाखवा, असे आव्हानच आढळराव यांनी दिले. 
  

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com