संकटातील सोलापूरच्या मदतीला धावले शरद पवार 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि सोलापूरचे नाते जिव्हाळ्याचे आहे. कारण, राजकीय कारकिर्दीच्या सुरुवाताच्या टप्प्यात राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असताना त्यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्रिपद होते. तेव्हापासून त्यांचे सोलापूरशी अतूट नाते आहे. संकटाच्या काळात ते कायम सोलापूरसाठी धावून आले आहेत.
Sharad Pawar visit to Solapur on Sunday to review the corona
Sharad Pawar visit to Solapur on Sunday to review the corona

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि सोलापूरचे नाते जिव्हाळ्याचे आहे. कारण, राजकीय कारकिर्दीच्या सुरुवाताच्या टप्प्यात राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असताना त्यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्रिपद होते. तेव्हापासून त्यांचे सोलापूरशी अतूट नाते आहे. संकटाच्या काळात ते कायम सोलापूरसाठी धावून आले आहेत. आताही जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते संकट पाहून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते येत्या रविवारी (ता. १९) सोलापूरमध्ये येत आहेत. 

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. विशेषतः शहरात संक्रमित रुग्णांची आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. प्रशासनाकडून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून सोलापूर शहर व परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तरीही संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद पवार रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. 

शरद पवार या वेळी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून कोरोनाची समस्या आणि उपाय योजना जाणून घेणार आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी कोणत्या उपाय योजना सुचवितात. तसेच महाराष्ट्र सरकारच्या मदतीसोबतच केंद्र सरकारची काही मदत सोलापूरला देण्यासाठी पवार काही निर्णय घेतात का? याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात येऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे दर आठवड्याला सोलापुरात असतात. 

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करावा, अशी विनंती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केली होती. ती विनंती मान्य करून शरद पवार दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री भरणे यांनी पवार यांना सोलापूरच्या लॉकडाउनबाबत कल्पना दिली होती. लॉकडाउबाबत जाब विचारल्याच्या सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट चुकीच्या आहेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर शहराचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा रविवारचा सविस्तर सोलापूर दौरा अद्याप आलेला नाही. पवार यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. कोरोनाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह अथवा नियोजन भवन या ठिकाणी होण्याची शक्‍यता आहे. 

- बळिराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सोलापूर 


Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com