केंद्रात ते खाते १० वर्ष माझ्याकडे होते; त्यामुळे भीतीचे कारण नाही!     

दुर्दैवाने माध्यमांनी महाराष्ट्रातील सहकारावर गंडांतर येईल, बंधणे आणली, असे काहीतरी पसरविले आहे.
Sharad Pawar.jpg
Sharad Pawar.jpg

माळेगाव : केंद्र सरकाने 'सहकार' मंत्रालयाची नव्याने निर्मिती करण्याच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील सहकार चवळीवर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेने सहाकरी कायदे केलेले असल्याने त्या कायद्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे केंद्र महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर काही गडांतर आणेल, या ज्या काही बातम्या येतात, माझ्या मते याला काही अर्थ नाही. केंद्रात १० वर्षे सहकार खाते माझ्याकडे होते. त्यामुळे केंद्र सरकारने (central government) नव्याने सहकाराबाबत जो निर्णय घेतला आहे, यात काही नविन असे नाही. (Sharad Pawar said on the cooperation department of the central government)  

दुर्दैवाने माध्यमांनी महाराष्ट्रातील सहकारावर गंडांतर येईल, बंधणे आणली, असे काहीतरी पसरविले आहे, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, राज्यात आरक्षणाच्या मुद्यांवरून संभ्रमाचे वातावरण झाले आहे, त्यात सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी कायद्याबाबत केंद्राला सूचना केली आहे, असे विचारले असता पवार म्हणाले,  ''या कायद्याबाबत केंद्र सरकारला अधिकार आहेत. जो पर्यंत केंद्र काय निर्णय घेत नाही, तो पर्यंत मी काहीही याबाबत भाष्य करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे मत नोंदविते त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार केंद्राला आहे. 

केंद्राने बाजार समितीत्यांसाठी १ लाख कोटींची तरतूद केली आहे. यावर बोलताना पवार म्हणाले, की हा धोरणात्मक निर्णय चांगला आहे. अलिकडच्या काळात जर मार्केट कमीट्या सुधारण्यासाठी केंद्राने भांडवली गुंतवणूक केली असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. भास्कर जाधवांना विधान सभेच्या अध्यक्षपदाचे वेद लागले आहेत, असे विचारले असता ते म्हणाले, ''विधान सभेच्या अध्यक्ष पदाबाबत आमच्या तिन्ही पक्षाचा निर्णय स्वच्छ झाला आहे. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसला गेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरविल ती व्यक्ती अध्यक्ष होईल.  

काँग्रेस पक्ष देईल त्या व्यक्तीला आमच्या तिन्ही पक्षाची मान्यता असेल. नाना पटोले स्वबळाची भाषा करतात, यावर पवार म्हणाले, की राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे राज्यातील प्रमुख पक्ष आहेत. प्रत्येक पक्ष आपले बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करणारच आहे. त्यात काही चुकीचे नाही. आम्ही सरकार एकत्र चालवितो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्र चालवत नाही. प्रत्यकाला आपापल्या पक्षाची व्याप्ती वाढावी, अशी इच्छा असणे गैर नाही. परंतु सरकार चालविताना एका विचार आहे की नाही, हे जर विचारले तर ते आहेत, असेच मी म्हणेन. 

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com