भास्कर जाधवांच्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत; शरद पवार म्हणाले...    - Sharad Pawar commented on the post of Speaker of the Legislative Assembly | Politics Marathi News - Sarkarnama

भास्कर जाधवांच्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत; शरद पवार म्हणाले...   

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 जुलै 2021

शिवसेना आमदार भास्कर जाधवांना विधानसभेच्या अध्यक्षपदाचे वेद लागले आहेत. 

बारामती : विधानसभेच्या अधिवेशनात ओबीसींचा प्रश्नावरुन गोंधळ झाला. त्यामध्ये भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबीत करण्यात आले. त्यावर रविवारी (ता. ११ जुलै) बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले. (Sharad Pawar commented on the post of Speaker of the Legislative Assembly)  

यावेळी पवार म्हणाले की, वास्तविक गोंधळ झाला. आता आपण त्यावर काय बोलणार, संबंधितांना तब्बल १ वर्ष निलंबित केले आहे. ज्यांनी चुकीचे काम केले त्यांना शिक्षा ही होणारच की, असे स्पष्ट मत व्यक्त करीत शरद पवार यांनी १२ आमदारांच्या निलंबन कारवाईचे समर्थन केले.

हेही वाचा : डॅा. भारती पवारांच्या राज्यमंत्रीपदामागे भाजपचा आहे 'हा' मनसुबा!

शिवसेना आमदार भास्कर जाधवांना विधानसभेच्या अध्यक्षपदाचे वेद लागले आहेत, असे विचारले असता ते म्हणाले, ''विधान सभेच्या अध्यक्ष पदाबाबत आमच्या तिन्ही पक्षाचा निर्णय स्वच्छ झाला आहे. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसला गेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरविल ती व्यक्ती अध्यक्ष होईल.   

काँग्रेस पक्ष देईल त्या व्यक्तीला आमच्या तिन्ही पक्षाची मान्यता असेल. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले स्वबळाची भाषा करतात, यावर पवार म्हणाले, की राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे राज्यातील प्रमुख पक्ष आहेत. प्रत्येक पक्ष आपले बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करणारच आहे. त्यात काही चुकीचे नाही. आम्ही सरकार एकत्र चालवितो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्र चालवत नाही. प्रत्यकाला आपापल्या पक्षाची व्याप्ती वाढावी, अशी इच्छा असणे गैर नाही. परंतु सरकार चालविताना एका विचार आहे की नाही, हे जर विचारले तर ते आहेत, असेच असे मी म्हणेन. 

हेही वाचा : आम्ही काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर नाही: काँग्रेस नेत्याची पवारांवर कडवट टीका 

दरम्यान, केंद्र सरकाने 'सहकार' मंत्रालयाची नव्याने निर्मिती करण्याच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील सहकार चवळीवर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेने सहाकरी कायदे केलेले असल्याने त्या कायद्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे केंद्र महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर काही गडांतर आणेल, या ज्या काही बातम्या येतात, माझ्या मते याला काही अर्थ नाही. केंद्रात १० वर्षे सहकार खाते माझ्याकडे होते. त्यामुळे केंद्र सरकारने नव्याने सहकाराबाबत जो निर्णय घेतला आहे, यात काही नविन असे नाही, असेही पवार यांनी सांगितले.    

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख