बारामतीच्या इमानदारीचा गळ्यातील पट्टा काढून सोलापूरकरांची सेवा करा

कमकुवत असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या साथीने सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली उजनीतून पाच टीएमसी पाणी चोरून नेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Service the people of Solapur by removing the belt of honesty of Baramati : Srikant Deshmukh
Service the people of Solapur by removing the belt of honesty of Baramati : Srikant Deshmukh

पंढरपूर  ः  सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली उजनी धरणातील (Ujani dam) 5 टीएमसी पाणी इंदापूरला (Indapur) पळवण्याचा घाट घातला गेला आहे, अशी टीका करत बारामतीच्या (Baramati) इमानदारीचा गळ्यातील पट्टा काढून सोलापूरकरांची (Solapur) सेवा करावी, असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Srikant Deshmukh) यांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांच्यावर केला. (Service the people of Solapur by removing the belt of honesty of Baramati : Srikant Deshmukh)

सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदार आणि खासदारांनी पालकमंत्री आणि राज्य सरकारच्या निष्क्रीयते विरोधात अलीकडेच आंदोलन केले होते. त्यावर पालकमंत्री भरणे यांनी नौटंकी न करता कोरोना काळात कृतिशील सहभाग नोंदवावा असे म्हणत भाजप आमदार व खासदारांना फटकारले होते. त्यावर आज (ता. १५ मे) भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी ‘पालकमंत्र्यांनी बारामतीकरांच्या इनामदारीचा गळ्यातील पट्टा काढून सोलापूरचे हित जोपासावे असे म्हणत पालकमंत्र्यांवर पलटवार केला.

श्रीकांत देशमुख म्हणाले की, कोरोनाचा अतिफैलाव झालेले देशभरात 90 जिल्हे आहेत, त्यात सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागतो. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याची जबाबदारी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने दत्तात्रेय भरणे यांची आहे. परंतु गेल्या दीड महिन्यात पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यात आढावा बैठक तर सोडाच साधी ऑनलाईन व्हर्च्युअल बैठकसुद्धा घेतली नाही.

दरम्यान, पंढरपूर विधानसभा पोटनिव़डणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी सोलापूरची आढावा बैठक घेतली. त्यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असतानाही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पुण्यास शेजारच्या जिल्ह्यातील रेमडेसिव्हिर इंजेक्शन साठा, कोरोना लस पळविली आहे.

सोलापूर जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यात दोन खासदार आणि आठ आमदार आहेत. याचाच राग मनात धरूनच राष्ट्रवादीचे पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करीत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.

कोरोना संकटकाळात सोलापूर जिल्ह्याला न्याय मिळावा, या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाचे आमदार व खासदारांनी राज्य सरकारच्या विरोधात लाक्षणिक उपोषण केले. केंद्राची सोलापूर जिल्ह्याच्या हिश्याची आलेली मदत पुण्यातून राजकीय ताकदीने अन्यत्र पळवली जात आहे. राज्याला मदत केंद्राची आणि जाहिरात राज्य सरकारच्या कामाची अशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे.

कमकुवत असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या साथीने सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली उजनीतून पाच टीएमसी पाणी चोरून नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. भविष्यात सोलापूर जिल्ह्यातील ऊस, फळबाग शेती उद्ध्वस्त करून जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com