आमच्या श्रद्धा आणि शक्ती स्थळावर हल्ला करणाऱ्यांचे कपडे उतरवले जातील

केंद्र सरकारच्या या धोरणांविरोधात आंदोलने करावीच लागतील.
Rasta Rocco agitation on behalf of NCP against the Central Government at Saswad on the issue of inflation
Rasta Rocco agitation on behalf of NCP against the Central Government at Saswad on the issue of inflation

सासवड शहर (जि. पुणे) : पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतीमाल आणि दुधाची वाहतूक करणदेखील परवडत नाही. त्यातच केंद्र सरकारने साखर कारखाने, सहकारी संस्था मोडीत काढण्याचा घाट घातला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आमच्या श्रद्धा आणि शक्ती स्थळावर जर कोणी हल्ला केला, तर त्याचे कपडे उतरवले जातील, असा इशारा माजी आमदार अशोक टेकवडे यांनी दिला. (Rasta Rocco agitation on behalf of NCP against the Central Government at Saswad on the issue of inflation)

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या कारखान्यावर झालेली कारवाई आणि सचिन वाझे याने केलेल्या आरोपानंतर भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनात पवार यांची सीबीआय चौकशीची झालेली मागणी या पार्श्वभूमीवर माजी आमदार टेकवडे यांनी दिलेला इशारा महत्वाचा मानला जातो.

सासवड (ता. पुरंदर) येथील बसस्थानका समोर ५ जुलै रोजी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या वेळी माजी आमदार टेकवडे यांनी वरील इशारा दिला..

पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले,  केंद्र सरकारकडे कोणतेही आर्थिक नियोजन नाही. मनमोहन सिंग सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होत्या. परंतु आज त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी असूनही पेट्रोल-डिझेलचे भाव हे केंद्र सरकार वाढवत आहे. केंद्र सरकारने बीएसएनएल, एलआयसी यांसारख्या अनेक कंपन्या विकण्याचे काम या केंद्र सरकारने केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.  

देशात व राज्यात प्रचंड इंधन दरवाढ झाली आहे. गॅस, पेट्रोल व डिझेलच्या तसेच रासायनिक खतांच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्यावर गेलेले आहेत. अशा या केंद्रातील शेतकरीविरोधी भाजप सरकारच्या विरोधात वाढती महागाई व इंधन दरवाढीविरोधात निषेध व रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याचे पुरंदर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे यांनी सांगितले.

सर्वसामान्य जनतेचे महागाईने कंबरडे मोडले आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या या धोरणांविरोधात आंदोलने करावीच लागतील, असे सुदाम इंगळे यांनी नमूद केले. 

या वेळी हेमंत माहुरकर, पुष्कराज जाधव, राजेंद्र धुमाळ, प्रकाश कड, राहुल गिरमे, पिंटू जगदाळे, संदेश पवार भैया खाटपे, भैयासाहेब खैरे, प्रकाश फरतडे, संदीप चिकणे, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्ष गौरीताई कुंजीर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका ऋतुजा धुमाळ, अजिंक्य टेकवडे, सौरभ कुंजीर, बंडुकाका जगताप, दत्ता चव्हाण, रोहिदास कुदळे, संतोष जगताप, बापू भोर, रामभाऊ बोरकर, बाजीराव कुंजीर, रामचंद्र खेडेकर, राजेश चव्हाण, मंगल म्हेत्रे, बाळासाहेब भिंताडे, संदेश पवार, नीलेश जगताप, बाळासाहेब कामठे, ऋषिकेश विठ्ठल झेंडे, महादेव शेंडकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com