पुणे जिल्हा पदवीधर मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला : गणेश भेगडे - Pune District is BJP's Baston Claims Ganesh Bhegade | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

पुणे जिल्हा पदवीधर मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला : गणेश भेगडे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

सासवड ( ता. पुरंदर ) येथे पुणे जिल्हा पदवीधर मतदार संघाच्या प्रचाराच्या भाजपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा पदवीधर मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी यावेळी केले.

गराडे :  पुणे जिल्हा पदवीधर मतदार संघाच्या प्रचाराची सुरुवात सासवड येथून होत असून साधारण ४८ हजार मतदार असलेली अंतिम यादी आज जाहीर होईल. ५ जिल्हे व ५८ तालुके असलेला हा मतदारसंघ आहे. प्रत्येक५० मतदारांच्या मागे १ कार्यकर्ता असणार आहे. ही निवडणुक विजयी होण्यासाठी भाजपचे आपले उमेदार संग्राम देशमुख यांना प्रथम क्रमांकाचे मतदान करून त्यांना विजयी करावे. तसा पुणे जिल्हा पदवीधर मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले.

सासवड ( ता. पुरंदर ) येथे पुणे जिल्हा पदवीधर मतदार संघाच्या प्रचाराच्या भाजपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेदवार संग्राम देशमुख, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे संघटन सरचिटणीस देवेंद्र खांडरे, सुदर्शन चौधरी, वैद्यकीय आघाडीचे डॉ. बाळासाहेब हरपळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, हवेलीचे अध्यक्ष धनंजय कामठे, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा ऋतुजा मुळीक, पुरंदरच्या महिला अध्यक्षा मीनाताई जाधव, हवेलीच्या महिला अध्यक्षा वैशाली पवार, दादासाहेब सातव, संदीप हरपळे, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण दगडे, हवेलीचे युवा मोर्चाचे सचिन हांडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य गिरीश जगताप, जेजुरी अध्यक्ष सचिन पेशवे, अलका शिंदे आदी उपस्थित होते.

गेले अनेक वर्षमी शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. पदवीधर मतदार संघाच्या समस्या मला माहित आहेत. त्यामुळे या समस्या सोडविण्यात माझा सातत्याने प्रयत्न राहील. प्रत्येक मतदार संघाशी माझा संपर्क आहे. ही निवडणूक वेगळ्या पद्धतीची असली तरी मला विजयाचा पूर्ण आत्मविश्वास आहे. तसेच हे मोठे आव्हान असले तरी चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आपण जिंकणारा असल्याचे उमेदवार संग्राम संपत देशमुख यांनी सांगितले. मेळाव्याचे आयोजन तालुका अध्यक्ष व सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आर. एन. जगताप यांनी केले. प्रास्ताविक तालुका कार्याध्यक्ष निलेश जगताप यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत थिटे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप यांनी मानले.

वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कोंढवा यांच्यावतीने कोंढवा व पुरंदर तालुक्यातील पदवीधर शिक्षक अशी 4500 हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यात संस्थेचे 185 पदवीधर मतदार आहेत. शिक्षकांच्या प्रश्नासंबंधित सातत्याने आम्ही काम करीत असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalka

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख