बारामतीत ओबीसी मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही

29 जुलैला बारामतीत ओबीसी समाजाच्या वतीने मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
 Police denied permission for OBC morcha in Baramati  .jpg
Police denied permission for OBC morcha in Baramati .jpg

बारामती : ओबीसी आरक्षणासाठी  (OBC Reservation) लढा तीव्र करणार असल्याचे राज्याचे पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सांगितले होते. त्या अंतर्गत 29 जुलैला बारामतीमध्ये ओबीसी मेळावा घेणार असल्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, बारामतीतील ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. (Police denied permission for OBC morcha in Baramati) 
  
29 जुलैला बारामतीत ओबीसी समाजाच्या वतीने मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरी देखील मोर्चा काढण्यावर मोर्चेकरी ठाम आहेत. बारामतीतील कसबा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा निघणार आहे. मोर्चाची सांगता डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार आहे. बारामतीतील प्रशाकीय इमारती जवळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार योगेश टिळेकर सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

ओबीसी मोर्चात 30 ते 40 हजार मोर्चेकरी सहभागी होण्याची शक्यता असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीकडे लक्ष द्यावे, लागेल असे म्हटले होते. त्यानंतर वडेट्टीवार यांनी मेळाव्याची घोषणा केली होती. त्यामुळे या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, आता पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे मोर्चा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षण टिकावे, महामंडळांना निधी द्यावा आणि घरकुल मिळावे, यासाठी आगामी दोन महिन्यांमध्ये बैठका आयोजित केल्या आहेत. त्यासाठी २२ जुलै पासून राज्यभर मेळावे घेणार आहे. ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून ६ ऑगस्टला बीडमध्ये मोर्चा काढणार आहे. ओबीसींनी एका झेड्यांखाली यावे आणि आपले प्रश्न सोडवावेत, यासाठी हे मेळावे होणार आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी समाजामध्ये जनजागृती करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले होते. आरक्षण संपवण्याचा घाट काही लोकांचा आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला होता. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com