लग्नसमारंभात जास्त वऱ्हाडी आल्यास 'बँड' वाजणार   - The number of Baramati corona patients increased | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

लग्नसमारंभात जास्त वऱ्हाडी आल्यास 'बँड' वाजणार  

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

कोरोनारुग्णांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसल्याने लोकांची चिंता वाढू लागली आहे.

बारामती : कोरोनारुग्णांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसल्याने लोकांची चिंता वाढू लागली आहे. परस्परांच्या संपर्कात आलेले लोक कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत. कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळेस पॉझिटीव्ह होत आहेत.  

दरम्यान, बारामती शहर व तालुक्यात लग्नसमारंभाला दोन्ही बाजूंकडील मिळून 50 जणांची परवानगी असतानाही अनेक लग्नात या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. आता मात्र, असे उल्लंघन आढळून आल्यास पोलिस कारवाई करतील असा इशारा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिला आहे. 

अनिल बोंडे व पोलिसांमध्ये बाचाबाची; दोघेही एकमेकांना म्हणाले ''तुम्ही कुत्रे''

 

लग्न समारंभासह गर्दी होणार्या ठिकाणांवर प्रशासनाची नजर आहे. सकाळी क्रिडांगणावर मास्कचा वापर न करता अनेक युवक खेळत असतात काही ठिकाणी स्केटींगच्या क्लासेसमध्ये लहान मुले विनामास्क पालकांसह येतात, पहाटे फिरायला येणार्या अनेकांच्या तोंडावर मास्क नसतात, अनेक ठिकाणी गर्दी होत आहे, या बाबींवरही आता प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.

काही ठराविक लोकांच्या निष्काळजीपणाचा फटका सर्वांना सहन करावा लागू नये, लोकांनीच स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे मत नागरिक बोलून दाखवित आहेत. काही जणांनी आपणहूनच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास प्रारंभ केला आहे. 

एमपीएससीची परीक्षा २१ मार्चला होणार 
 

दुसरीकडे दवाखान्यांमध्ये दाखल होणार्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णास आता अनिवार्यपणे रुग्णालयातच दाखल व्हावे लागत असल्याने दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. अर्थात अजूनही सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचीच संख्या अधिक आहे. 
 
रुग्णांची संख्या वाढली तरी रुग्णालयात जागा नसल्याने उपचार होऊ शकणार नाही, ही स्थिती उदभवू नये या साठी आरोग्य, नगरपालिका व महसूल यंत्रणा काम करत आहे. रोजच्या रोज रुग्णसंख्या व उपलब्ध बेडस यांचा आढावा घेतला जात आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख