आता लोकच म्हणताहेत, ईव्हीएम बंद करून बॅलेटवर मतदान घ्या 

केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून निवडणूक पद्धतीबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
Now people are saying, turn off the EVM and vote on the ballot : Nana Patole
Now people are saying, turn off the EVM and vote on the ballot : Nana Patole

आळंदी : लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे मत कुठे जातेय, हे समजून घेण्याचा अधिकार मतदात्याला आहे. पदवीधर मतदारसंघासाठी बॅलेट पेपरद्वारे झालेले मतदान योग्य आहे, हे पुन्हा सिद्ध झाले. आता लोकच मागणी करत आहेत की ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेटवर मतदान घ्या. त्यामुळे लोकांचा कल पाहून केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून निवडणूक पद्धतीबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी वारीबाबत आढावा घेण्यासाठी आणि वारकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी नाना पटोले आळंदीत आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. 

या वेळी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, ऍड विकास ढगे, योगेश देसाई, नीलेश लोंढे, संजय घुंडरे, डी. डी. भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, राम गावडे, नंदकुमार वडगावकर, संदीप नाईकरे, गोविंद गोरे, बाळासाहेब रावडे, मुख्याधिकारी अंकुश जाधव उपस्थित होते. 

विधानसभेचे अध्यक्ष पटोले म्हणाले की, "आम्ही कुणाला मतदान दिले, हे लोकांना समजले पाहिजे. लोकशीहीतील ही व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे देश कृषिप्रधान आहे. मी 2017 मध्ये राजीनामा दिल्यानंतर शेती आणि कायद्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती. केंद्र सरकार सध्या लादत असलेल्या शेती कायद्यास बहुतांश ठिकाणी विरोध केला जात आहे. विरोधी पक्षाने विरोध केला, तर सत्ताधारी त्या भूमिकेला राजकीय मानतात.' 

"दिल्लीत कडाक्‍याची थंडी असूनही लाखो शेतकरी रस्त्यावर बसून आहेत. सरकारकडून केवळ बैठकीच्या फेऱ्या सुरू असून आतापर्यंत चार फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, समाधानकारक तोडगा अद्याप निघू शकला नाही. आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच या प्रश्नात लक्ष घालून तोडगा काढणे आवश्‍यक आहे. केंद्रीय मंत्री मंडळातील अनेक मंत्रीही शेतकऱ्यांच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत. सुधारणा करण्याचे मंत्र्याने मान्य केले आहे,' असे पटोले यांनी नमूद केले. 

शेतकऱ्यांसोबत झालेली मागण्यांबाबतची चर्चा लिखित रूपात बदल करून प्रश्न निकाली काढणे आवश्‍यक आहे. अन्नदात्याला थंडीत न्याय हक्कासाठी रस्त्यावर बसतो हे देशाच्या कृषीप्रधान सांस्कृतीक बसत नसल्याची टीकाही केंद्र सरकारबाबत पटोले यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com