जनतेने दुसऱ्यांदा घरी बसवलेल्या हर्षवर्धन पाटलांनी राज्यमंत्री भरणेंच्या कामाचे श्रेय लाटू नये

त्यानंतर राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी गडकरी यांना या कामाचे महत्व सांगून निधी मंजूर करण्याची मागणी केली होती.
NCP's Pune district president Pradip Garatkar criticizes former minister Harshvardhan Patil
NCP's Pune district president Pradip Garatkar criticizes former minister Harshvardhan Patil

इंदापूर (जि. सोलापूर) : ‘‘भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या भावनेतून वागत आहेत. ते सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पालखीमार्ग कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा राजकारणासाठी राजकारण करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. जनतेने तुम्हास २० वर्षे राज्य मंत्रिमंडळात विश्वासाने काम करण्याची संधी दिली होती. केंद्र व राज्यात तुमचे सरकार होते. मात्र, लोकहिताची कामे न केल्यामुळे जनतेने तुम्हास दुसऱ्यांदा घरी बसविले, त्यामुळे आपण राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका,’’ असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिला.

इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये देहू, आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्ग विकास कामांवर आयोजित पत्रकार परिषदेत गारटकर बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा सरचिटणीस वसंत आरडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ग्राहक समितीचे कार्याध्यक्ष रमेश पाटील उपस्थित होते.

प्रदीप गारटकर म्हणाले, दत्तात्रेय भरणे हे २०१६ मध्ये आमदार असताना दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पालखी मार्ग विकासासाठी पत्र दिले होते. त्यानंतर राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी गडकरी यांना या कामाचे महत्व सांगून निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सलग तीन वर्षे सतत पाठपुरावा केल्यामुळे पालखी मार्गासाठी हा निधी मंजूर झाला. हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जाऊन एक वर्ष झाले आहे. त्यामुळे त्यांनी श्रेय लाटू नये. याउलट त्यांनी त्यांच्या ताब्यातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून गाळप झालेल्या उसाचे पैसे वेळेत द्यावेत, असा सल्लाही गारटकर यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिला.


हेही वाचा : आवताडेंच्या विजयासाठी झटणाऱ्या रणजितसिंहांना कोरोना; क्वारंटाइन कोण कोण होणार

मंगळवेढा (जि. सोलापूर)  ः पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी मंगळवेढा शहरासह तालुक्यातील 10 गावांत प्रचारसभा घेतल्या आहेत. पोटनिवडणुकीनंतर तालुक्यात कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याची गरज आहे.


मोहिते पाटलांच्या सभांना ब्रेक

मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुरळा उडला आहे. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी समाधान आवताडे यांना विजयी करायचेच, या भूमिकेतून आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी माघार घ्यावी म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत बबनराव आवताडे यांच्यासोबत बैठक घेतली होती. तसेच त्यांच्याबरेाबर प्रचारसभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापासून सर्व नेते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे आता क्वारंटाईन कोण कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com