कोल्हेंचा आढळरावांना टोला; त्यांना उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही! - NCP MP Amol Kolhe criticizes former MP Shivajirao Adlrao Patil  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

कोल्हेंचा आढळरावांना टोला; त्यांना उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 जुलै 2021

मुख्यमंत्र्यांच्या नावाने स्थानिक पातळीवर राजकारण करु नये. आपल्या स्वारथासाठी राज्य सरकारला नख लावण्याचे काम कोणी करुन नये.

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या विकासकामांच्या श्रेयवादावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्ष होत आहे . पुणे- नाशिक महामार्गाच्या खेड घाट बाह्यवळणाचे उद्धाटन करण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adlrao Patil) यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेला आता त्यांनी प्रत्युत्तर दिले. (NCP MP Amol Kolhe criticizes former MP Shivajirao Adlrao Patil) 

अमोल कोल्हे म्हणाले की ''मुख्यमंत्र्यांच्या नावाने स्थानिक पातळीवर राजकारण करु नये. आपल्या स्वारथासाठी राज्य सरकारला नख लावण्याचे काम कोणी करुन नये. स्थानिक पातळीवरचे विधान होते. पण, त्याला राज्य पातळीवर दाखवण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असे दाखवण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून होत'' असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला. 

हेही वाचा : नवज्योतसिंग सिद्धू जिंकले..बनले पंजाबचे कॅप्टन!

पुर्ण पणे स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. त्यामुळे भांड्याला भांडे लागणारच, महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. त्या विधानाचा राज्य पातळीवर अर्थ लावण्याची गरज नाही. सगळे नेते अत्यंत समन्वयाने काम करत आहेत. महाविकास आघाडी सरकार सक्षम आहे. हे सरकार देशासमोरील भविष्यातील उदाहरण आहे, असेही कोल्हे यांनी सांगितले.   

आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कोल्हे म्हणाले, माणूस ज्या शब्दात टीका करतो, त्यावरुन त्याची संस्कृती कळते. वैयक्तिक बाबींवर टीका करण्यात मला स्वारस्य नाही. माझ्या शिरुर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, जनतेशी कटिबद्ध आहे. विकासकामांबद्दल जनतेला माहिती आहे. त्यामुळे वैयक्तिक चिखलफेक करुन अकारण माझ्या मतदारसंघाचे नाव वेगळ्या आणि चुकीच्या कारणासाठी चर्चेत आणणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेवर कुठलेही उत्तर द्यायची मला आवश्यकता वाटत नाही, असेही कोल्हे यांनी सांगितले.

हेही वाचा : स्वबळाची भाषा बोलणारे काँग्रेस नेते मोदी-पवार भेटीमुळे अचंबित! 

आढळराव पाटील काय म्हणाले होते...

आपसातल्या भांडणात खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी ठाकरे, पवार यांना मधे आणण्याचे कारणच नव्हते. या नेत्यांवर बोलण्याइतकी कोल्हेंची उंची नाही. हे म्हणजे कोल्ह्याने उंटाचा मुका घेण्यासारखे आहे, असा पलटवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. पुणे जिल्ह्यात फक्त खासदार कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते या दोघांमुळेच महाविकास आघाडीत बिघाडी आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख