मुळशी-मावळचे प्रांत कार्यालय होणार बावधनला ; कॉंग्रेस-राष्ट्रवादीत रंगला श्रेयवाद

हे कार्यालय उभारणीसाठी तीन कोटी चौतीस लाख रूपयांची तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे.
 Mulshi - Maval sub-divisional office to be held at Bavdhan; The battle of credit between Congress and NCP
Mulshi - Maval sub-divisional office to be held at Bavdhan; The battle of credit between Congress and NCP

पौड (जि. पुणे) : मुळशी आणि मावळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या महसुली कामासाठी पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले प्रांत कार्यालय आता बावधन (ता. मुळशी) येथे स्थलांतरीत होणार आहे. बावधन येथे होणाऱ्या नव्या इमारतीसाठी 3 कोटी 34 लाख रुपयांची मंत्रालयातून तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नांमुळे प्रांत कार्यालयाला नवीन इमारत मिळणार आहे. तथापि, महाविकास आघाडीचे सरकार असतानाही प्रांत कार्यालयाच्या स्थलांतराचे श्रेय लाटण्यासाठी मुळशीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर स्पर्धा सुरू आहे. 

सध्या मुळशी आणि मावळचे प्रांत कार्यालय पुणे स्टेशनजवळील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आहे. पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे कार्यालय दोन्ही तालुक्‍यातील लोकांसाठी खूपच गैरसोयीचे होते. दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आपल्या छोट्याशा कामासाठीही प्रांत कार्यालयात येण्यासाठी संपूर्ण दिवस घालवावा लागत होता. त्याचप्रमाणे प्रवासासाठीही पैशाचा अपव्यय होत होता. पुण्यातील वाहतूक कोंडीचाही ताण त्यांना सहन करावा लागत होता. त्यामुळे मुळशी, मावळ तालुक्‍यांसाठी असलेले हे प्रांत कार्यालय शेतकऱ्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक भुर्दंडात टाकणारे होते. 

बावधन बुद्रूकमध्ये तलाठी कार्यालयाजवळ महसूल विभागाची जागा आहे. येथे पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीची इमारतही उभी राहिली आहे. याठिकाणी प्रांत कार्यालय झाल्यास दोन्ही तालुक्‍यातील शेतकऱ्यांना येणे जाणे सोयीस्कर होईल. त्यामुळे येथे हे कार्यालय स्थलांतरीत करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुळशी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती. सुळे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून पत्रही दिले होते. आमदार संग्राम थोपटे यांनीही कार्यालय स्थलांतराबाबत यापूर्वी मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे अखेर त्यास यश आले आहे. 

बावधन येथे नव्या आर्थिक वर्षात या कार्यालयाच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. हे कार्यालय उभारणीसाठी तीन कोटी चौतीस लाख रूपयांची तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे. तथापि, महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन्ही कॉंग्रेस नेत्यांच्या प्रयत्नांतून या कार्यालयाच्या स्थलांतरणाला परवानगी मिळाली आहे. असे असतानाही मुळशीत मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर श्रेयवाद चांगलाच रंगला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com