खासदार सुप्रिया सुळे यांनी मानले रेल्वे मंत्री गोयल यांचे आभार

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्याकरिता मेमू सेवा ८ एप्रिल पासून सुरू होणार आहे.
  Supriya Sule, Piyush Goyal .jpg
Supriya Sule, Piyush Goyal .jpg

दौंड  : दौंड - पुणे - दौंड दरम्यान मेमू  (मेनलाइन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) रेल्वे सुरू करण्याची बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांचे आभार मानले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्याकरिता मेमू सेवा ८ एप्रिल पासून सुरू होणार आहे. 

दौंड - पुणे - दौंड दरम्यान प्रवासाकरिता अनेक सुपरफास्ट, एक्सप्रेस व अन्य रेल्वेगाड्या असल्या तरी त्यामध्ये आसन उपलब्ध होत नसल्याने या मार्गावरील प्रवाशांकरिता दौंड - पुणे दरम्यान स्वतंत्र गाडी सुरू करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी सातत्याने रेल्वे मंत्री पियुष गोयल, रेल्वे मंत्रालय आणि संबंधित कार्यालयांकडे करीत त्यासाठी पाठपुरावा केला होता. दौंड - पुणे लोहमार्गाचे विद्युतीकरण २०१६ मध्ये पूर्ण झाल्याने स्वंतत्र गाडी सुरू करण्यासाठी सुळे आग्रही होत्या. गोयल यांनी मागणीची दखल घेतल्याने रेल्वे प्रशासनाने येत्या ८ एप्रिल पासून दौंड - पुणे - दौंड दरम्यान मेमू सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मेमू सेवेमुळे दौंड - पुणे दरम्यान हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, उरूळी कांचन, यवत, खुटबाव, केडगाव, कडेठाण, पाटस व दौंड येथून पुण्याला दैनंदिन प्रवास करणारे हजारो विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, कर्मचारी, भाजीपाला व दूध विक्रेते, शेतकरी, आदींच्या वेळेची व पैशांची बचत होणार आहे. सध्या ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू होत असली तरी आगामी काळात सर्वच प्रवाशांना या गाडीने प्रवास करता यावा याकरिता पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही सुळे यांनी दिली. 

दौंड - पुणे मेमू सेवा सुरू होत असली तरी पुणे - दौंड - बारामती दरम्यान सुद्धा मेमू सुरू व्हावी, याकरिता पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सुळे यांनी दिली.

पवार यांच्या निवासस्थानी आले होते गोयल

नवी दिल्ली येथी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शासकीय निवासस्थानी पीयुष गोयल यांना एका बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये गोयल यांनी दौंड - पुणे - लोणावळा दरम्यान मेमू सुरू करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. सततचा पाठपुरावा आणि मागणीची दखल घेत येत्या ८ एप्रिल पासून दौंड - पुणे दरम्यान मेमू सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com