इंदापूरच्या ‘दूधगंगा’चे अध्यक्ष मंगेश पाटील यांचे कोरोनामुळे निधन

ते भाजपचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक होते.
Mangesh Patil, president of Dudhganga Dudhsangha of Indapur, died due to corona
Mangesh Patil, president of Dudhganga Dudhsangha of Indapur, died due to corona

इंदापूर (जि. पुणे)  ः इंदापूर येथील दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे विद्यमान अध्यक्ष मंगेश ऊर्फ बाबा वामनराव पाटील (वय 55) यांचे निधन झाले. मंगेश पाटील यांना मंगळवारी हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. उपचारादरम्यान त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने आज त्यांचे निधन झाले. ते भाजपचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक होते. 

त्यांच्या मागे आई, पत्नी दोन भाऊ, एक मुलगी, जावई असा परिवार आहे.  पाटील त्यांच्या निधनानंतर इंदापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहिली. 

गुढीपाडवाच्या दिवशी (ता. 13 एप्रिल) त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला होता. त्यांच्यावर इंदापूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अकलूज येथील डॉ. एम. के. इनामदार यांच्याकडे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. तेथे तपासणीत त्यांना कोरोना असल्याचे दिसून आले, त्यातच त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने गुरुवारी (ता.15 एप्रिल) त्यांचे निधन झाले. 

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे ते कट्टर सहकारी होते. हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, हर्षवर्धन पाटील सहकारी मोटार वाहतूक संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. खासगी दूध संस्थांच्या स्पर्धेत सहकारी दूध संघ मागे पडल्याने इंदापूरचा दूधगंगा दूध संघ बंद पडला होता. मात्र, मंगेश पाटील यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा दुधगंगा अमूल दूध संघाच्या सहकार्याने सुरू केला होता. 

इंदापूर लायन्स क्लबचे ते संस्थापक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी यशस्वी उद्योजक तसेच राजकीय नेता म्हणून नाव कमविले होते. हर्षवर्धन पाटील यांच्या चांगल्या व पडत्या काळात त्यांनी निरंतरपणे साथ दिली. स्वामीराज उद्योग समूह तसेच इंदापूर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मेघ:श्याम पाटील यांचे ते भाऊ होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com