ही करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात; आता तुम्ही दिवस मोजायला सुरुवात करा 

त्यांच्याकडील तिजोरीच्या चाव्या फक्त बारामती मतदारसंघापुऱत्याचउघडतात.
Leaders of Mahavikas Aghadi should count the days now: MP Ranjit Singh Naik Nimbalkar's warning
Leaders of Mahavikas Aghadi should count the days now: MP Ranjit Singh Naik Nimbalkar's warning

 पंढरपूर  ः ‘ये तो अभी सिर्फ झांकी है, पुरा महाराष्ट्र अभी बाकी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगिलेल्या करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. तुम्ही दिवस मोजायला सुरुवात करा. पंढरपूर जिंकल्यानंतर आता राज्यातसुद्धा शंभर टक्के सत्तांतर होईल, असा इशारा पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची जबाबदारी असलेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीला दिला.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आज भाजपचे समाधान आवताडे यांनी ३ हजार ७३३ मतांच्या फरकाने राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. आवताडे यांना १ लाख ०९ हजार ४५० मते मिळाली, तर भालके यांना १ लाख ०५ हजार ७१७ मते मिळाली आहेत. पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय  मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी मतदारसंघात तळ ठोकूनही त्यांचा पराभव झाला आहे. या विजयानंतर खासदार निंबाळकर बोलत होते.

 
खासदार निंबाळकर म्हणाले की, उजनीच्या पाण्यासंदर्भात आम्ही आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे व जिल्ह्यातील इतर आमदारांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मेसेज केला आहे. आम्हाला उद्याच उजनीच्या पाण्यासंदर्भात भेट मिळावी. कारण आमच्या दृष्टीने उजनीच्या पाण्याचे महत्व मोठे आहे. उजनीचे पाणी चोरणाऱ्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे. सोलापूरचे दोन्ही खासदार आणि पक्षाचे सर्व आमदार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. उद्या वेळ मिळाला तर आम्ही कोणताही विजयोत्सव साजरा न करता उजनीच्या पाण्यासंदर्भात आम्ही पवारांच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करणार आहोत. 

उजनीच्या पाण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका आणि राजधर्म पाळावा. कारण ते कोणत्याही एक पक्षाचे नसतात. ते संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात. त्यांच्या स्वीय्य सहायकांशी बोलताना आम्ही ही भूमिका मांडली आहे, असेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर, मंगळवेढ्यातील जनतेने दाखवून दिली आहे की महाराष्ट्राची जनता आणि त्यांचा कौल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे. माढा मतदासंघानंतर पंढरपूर धूळ चारणार हे मी अगोदरच सांगत होतो. त्यांचे खायचे दात आणि दाखवयाचे दात वेगळे आहेत. मतदारसंघातील ३५ गावांना ते पाणी देणार नाहीत, ते पाणी पळवणार आहेत, हे निवडणुकीच्या प्रचारातच सांगत होतो. त्यांचे दाखवायचे दात हे निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी दिसून आले. त्यांच्याकडील तिजोरीच्या चाव्या फक्त बारामती मतदारसंघापुऱत्याच उघडतात. इतर ठिकाणी माणसं नाही तर जनावरं राहतात, असं त्यांचं मत असतं, अशा शब्दांत खासदार निंबाळकरांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

विजयी झाल्यानंतर समाधान आवताडे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना मतदारसंघातील ३५ गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. उजनीचे जे 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यात पळवले आहे ते थांबवण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com