कुख्यात गुंडास कोरोना लस देण्याची शिफारस केली अन्‌ सरपंचाच्या हाती बेड्या पडल्या - Kunjirwadi Sarpanch Anju Gaikwad arrested for recommending corona vaccine to notorious goons-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

कुख्यात गुंडास कोरोना लस देण्याची शिफारस केली अन्‌ सरपंचाच्या हाती बेड्या पडल्या

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

शुभम कामठे व अंजू गायकवाड यांचा भाऊ अजय यांची मैत्री आहे.

उरुळी कांचन (जि. पुणे) : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील कुख्यात गुंड शुभम कामठे यास कोरोनाची लस देण्याची शिफारस करणे कुंजीरवाडीच्या (ता. हवेली) सरपंचांना चांगलेच अडचणीत आणणारे ठरले आहे. गुंड शुभम कामठे मोकासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी आहे. शुभम कामठे यास कोरोनाची लस देण्याची शिफारस करण्याबरोबरच, त्याला मदत केल्याच्या कारणावरुन हडपसर पोलिसांनी अंजू गुलाब गायकवाड यांच्यासह पाच जणांना बुधवारी (ता. २१ जुलै) रात्री अटक करण्यात आली आहे. (Kunjirwadi Sarpanch Anju Gaikwad arrested for recommending corona vaccine to notorious goons)

अंजू गायकवाड या कुंजीरवाडीच्या विद्यमान सरपंच आहेत. त्यांनी शुभम कामठे याला कोरोनाची लस देण्यासाठी कुंजीरवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शिफारस केली होती. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अंजू गुलाब गायकवाड यांच्यासह त्यांचा भाऊ व कुंजीरवाडीचा माजी ग्रामपंचायत सदस्य अजय गुलाब गायकवाड, विकी म्हस्के (डाळींब ता. दौंड), मेघराज वाल्मिक काळभोर व योगेश रवींद्र काळभोर या पाच जणांना अटक केली आहे. 
 
हेही वाचा : अनिल देशमुखांची याचिका फेटाळली; सीबीआयसमोर आता जावे लागणार

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम कामठे हा लोणी काळभोर हद्दीतील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हडपसर व लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत खून, खुनाचे प्रयत्न, लुटमार यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर शहर पोलिसांनी नुकताच मोकाही लावलेला आहे. मोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर शुभम कामठे हा काही काळ फरारी होता. याच काळात शुभम कामठे याला लस देण्यासाठी अंजू गायकवाड यांनी मदत केली होती.

दरम्यान, शुभम कामठे याला अटक केल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली. यात कामठे याने फरारी असताना अंजू गायकवाड, त्यांचा भाऊ अंजय गायकवाड, विकी म्हस्के, मेघराज वाल्मिक काळभोर व योगेश रवीद्र काळभोर या पाच जणांनी मदत केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच, फरारी असताना अंजू गायकवाड वगळता उर्वरीत चार जणांनी कामठे याला मदत केल्याची कबुलीही पोलिसांनी दिली.

शुभम कामठे व अंजु गायकवाड यांचा भाऊ अजय यांची मैत्री आहे. त्यामुळे कामठे यास लस देण्यासाठी अंजू गायकवाड यांनी कुंजीरवाडी येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शिफारस केली होती. मात्र, ही शिफारस थेट तुरुंगात घेऊन गेली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख