खेड बाजार समितीचे उपसभापती धारू गवारी यांचे कोरोनामुळे निधन - Khed Bazar Samiti Deputy Chairman Dharu Gawri dies due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खेड बाजार समितीचे उपसभापती धारू गवारी यांचे कोरोनामुळे निधन

राजेंद्र सांडभोर
मंगळवार, 20 एप्रिल 2021

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.

राजगुरुनगर (जि. पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती धारू कृष्णा गवारी ऊर्फ गुरूजी (वय ७३) यांचे सोमवारी (ता. १९ एप्रिल) कोरोनामुळे निधन झाले. गवारी यांच्या पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेले गवारी हे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुसरे संचालक आहेत. गेल्या वर्षी राजू काझी यांचाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला होता. 

उपसभापती धारू गवारी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात गेली दहा ते बारा दिवस उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोनाने मृत्युमुखी पडलेले खेड बाजार समितीतील ते दुसरे संचालक आहेत. गेल्या वर्षी राजू काझी नावाचे संचालक कोरोनामुळे दगावले होते. 

धारू गवारी हे प्राथमिक शिक्षक होते. केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे ते माजी उपसभापती होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर ते दोनदा निवडून आले होते. या वेळी ते दुसऱ्यांदा उपसभापती झाले होते. त्या पदावर कार्यरत असतानाच त्यांचे निधन झाले आहे. 
 
‘‘गवारी गुरूजी आमच्या संचालक मंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. आमदार दिलीप मोहिते यांचे ते खंदे समर्थक होते. त्यांच्या निधनामुळे खेडच्या पश्चिम भागातील एक प्रामाणिक राजकारणी आणि आम्हा सर्वांचा मार्गदर्शक हरपला आहे,’’ अशी भावना खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख