भाजपचे संग्राम देशमुख यांना अपक्ष जयंत लंगडे यांचा पाठिंबा 

पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच गती मिळू शकते.
Independent Jayant Langde supports BJP's Sangram Deshmukh
Independent Jayant Langde supports BJP's Sangram Deshmukh

सातारा : पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच गती मिळू शकते, याची खात्री पटल्याने पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्रामव देशमुख यांना पाठिंबा देत असल्याचे अपक्ष उमेदवार जयंत लंगडे यांनी जाहीर केले. 

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना पाठिंबा जाहीर करताना साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी वरील मत व्यक्त केले. भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, पश्‍चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे, पश्‍चिम महाराष्ट्राचे विभाग प्रमुख मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक विजय काटवटे, भारत मुळे, राजेंद्र इंगळे, विठ्ठल बळशेटवार, विकास गोसावी आदींच्या प्रमुख उपस्थितीत जयंत लंगडे यांनी पाठिंब्याची घोषणा केली. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम आखण्याचे आश्वासन मिळाल्याने भाजप उमेदवारांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतल्याचेही या वेळी जयंत लंगडे यांनी जाहीर केले. 

सातारा नगरपालिकेचे नगरसेवक विजय काटवटे यांच्या माध्यमातून पाठिंबा देण्याबाबतच्या चर्चेस गती आली. त्यामुळे विकासाचा खरा चेहरा असणाऱ्या भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या नावासमोर प्रथम पसंतीचा एक हा अंक लिहावा, असे आवाहन या वेळी लंगडे यांनी त्यांच्या भाषणात केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com