उदयनराजेंना गुंड म्हणणाऱ्या उद्योजकाची धिंड काढली  

त्यांचे बनियन व शर्ट काढून त्यांच्या तोंडाला काळे फासले.
An Indapur businessman who called Udayan Raje a goon was beaten
An Indapur businessman who called Udayan Raje a goon was beaten

इंदापूर (जि. पुणे) : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना गुंड म्हटल्याच्या कारणावरून इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील वाय ऍक्सेस स्ट्रक्चरल स्टील प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे उद्योजक अशोक जिंदाल यांना शिवधर्म फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यांची इंदापूर पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढून त्यांना काळे फासण्यात आले. (An Indapur businessman who called Udayan Raje a goon was beaten) 

खासदार उदयनराजे यांच्या संदर्भात अपशब्द वापरल्याने तसेच महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याने अशोक जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवधर्म फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली, तर जिंदाल यांना मारणाऱ्या सात जणांवर विविध कलमाखाली इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. यामध्ये इंदापूर, अकलूज व बारामती येथील कार्यकर्त्यांचा समावेश आहे, अशी माहिती इंदापूरचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.

लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत २४ जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास अशोक  जिंदाल यांनी छत्रपती उदयनराजे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक उर्फ अण्णा सीताराम काटे (वय २८, रा. इंदापूर) आणि त्यांच्या १० ते १२ सहकाऱ्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून तसेच कोरोना महामारीत तोंडाला मुखपट्टी न बांधता जिंदाल यांना मारहाण केली. त्यांचे बनियन व शर्ट काढून त्यांच्या तोंडाला काळे फासले. त्यांची इंदापूर पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली. 

या प्रकरणी दीपक काटे (रा. इंदापूर), अमोल अंकुश पवार (वय २५  रा. गांधी चौक, नवीन बाजारतळ अकलूज, ता. माळशिरस जि. सोलापूर), कुणाल शिवाजी चव्हाण (वय ३३,  रा. विजय चौक अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर), प्रदीप चंद्रकांत भोसले (वय २४, रा. राऊत नगर अकलूज), किरण रवींद्र साळुंखे (वय २७, रा. भाग्यनगर, भवानीनगर, ता. इंदापूर ), अक्षय चंद्रकांत चव्हाण (वय २५,  रा. श्रीरामनगर भिगवण रोड, बारामती),  सुनील विठ्ठल रायकर (वय २३,  राऊत नगर अकलूज) या सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली. 

वरील संशयित आरोपीवर इंदापूर पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल अमोल गारुडी यांनी फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने तपास करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com