If you leave the house for no reason, the police will take notice of your style : Rajendra Mokashi
If you leave the house for no reason, the police will take notice of your style : Rajendra Mokashi

विनाकारण घराबाहेर पडाल तर पोलिस आपल्या स्टाइलने दखल घेतील

लोणी काळभोर व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

लोणी काळभोर (जि. पुणे)  ः ऊरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीतील नागरिकांनो, पुढील साठ तास म्हणजेच दोन दिवस विनाकारण घराबाहेर पडाल, तर आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अगदी गरज असेल, तरच घराबाहेर पडा; अन्यथा लोणी काळभोर पोलिस आपल्या स्टाईलने दखल घेतील, असा इशारा लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ब्रेक द चैन या मोहिमेंतर्गत शुक्रवारी (ता. ९ एप्रिल) ते सोमवारी (ता. १२ एप्रिल) सकाळी सातपर्यंत पुणे महानगरपालिकेप्रमाणेच शहरालगतच्या लोणी काळभोर व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी लोणी काळभोर पोलिसांनी काटेकोरपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती देताना राजेंद्र मोकाशी यांनी हा इशारा दिला.  

याबाबत अधिक माहिती देताना राजेंद्र मोकाशी म्हणाले की, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ब्रेक द चैन या मोहिमे अंतर्गत पुढील साठ तास अत्यंत काटेकोरपणे जनता कर्फ्यू राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मेडिकल, किराणा दुकान, चिकन-मटणाची दुकाने व दूध विक्री अशा अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व प्रकारचे व्यवसाय बंद राहणार आहेत. 

नागरिकांना अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडता येणार आहे. घराबाहेर पडताना कामाबाबतची आवश्यक ती कागदपत्रे जवळ नसल्यास संबंधितावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे; अन्यथा पोलिस आपल्या स्टाईलने कारवाई करण्यास समर्थ आहेत, असेही मोकाशी यांनी सांगितले.

मोकाशी म्हणाले की, सोमवारी (ता. १२ एप्रिल) सकाळी सातपर्यंत रिक्षा, बस, टॅक्सी, खासगी वाहने व सार्वजनिक वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या काळात ॲम्बुलन्स शिवाय एकही वाहन रस्त्यावर येणार नाही. याची पोलिस यंत्रणा काळजी घेणार आहे. या काळात कोणी गरज नसताना वाहने रस्त्यावर आणल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे मोकाशी यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com