श्रेष्ठींनी आदेश दिल्यास विधान परिषदेची निवडणूक लढवणार - I Will contest Legislative Council elections : Dilip Mane-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

श्रेष्ठींनी आदेश दिल्यास विधान परिषदेची निवडणूक लढवणार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 जुलै 2021

महाविकास आघाडीकडे सहमतीचे उमेदवार म्हणून माने यांचे नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी माझ्या नावाची चर्चा होत आहे. चर्चा जरी होत असली तरीही महाविकास आघाडीच्या श्रेष्ठींनी आदेश दिल्यास कार्यकर्त्याशी चर्चा करुन निवडणूक लढवणार आहे, असे माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले. (If the elites of Mahavikas Aghadi give orders, i will contest the Legislative Council elections : Dilip Mane)

पृथ्वीराज माने युवा मंचच्या शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाकणी, शिवणी व विश्वनाथ नगर येथील शाखांचे उद्‌घाटन झाले. गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या उमेदवारीकरिता दिलीप माने यांच्या नावाची चर्चा होत आहे. ते सध्या शिवसेनेत असले तरी त्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक वाढली आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढत माने यांच्या घरी भेट दिली होती. 

हेही वाचा : वसई-विरार, भिवंडी महापालिकेची हद्द वाढणार; या गावांचा होणार समावेश 

विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडे सहमतीचे उमेदवार म्हणून माने यांचे नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिलीप माने यांनी निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे सांगणे महत्त्वाचे आहे.   

(स्व.) ब्रह्मदेवदादा माने आणि माझ्यावर उत्तर सोलापूर तालुक्‍यातील जनतेने केलेले प्रेम माने परिवार कधीही विसरू शकणार नाही. या उपकाराची परतफेड करण्यासाठी पृथ्वीराज माने समाजकारणात आले आहेत. ते पंचायत समिती, जिल्हा परिषद या अन्य संस्थेच्या निवडणुका लढवणार नाहीत, असेही माजी आमदार माने यांनी सांगितले.  

पृथ्वीराज माने म्हणाले, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बेरोजगार, उद्योजक, शैक्षणिक यांसह रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न घेऊन युवकांच्या माध्यमातून मी काम करणार आहे. दादा आणि बाबांना दिलेले प्रेम, मला आशीर्वाद म्हणून द्यावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

या वेळी सभापती रजनी भडकुंबे, सदस्य हरीदास शिंदे, बाळासाहेब सुरवसे, रावसाहेब शिंदे, अनिल पाटील, नेताजी सुरवसे, उमेश भगत, गोविंद पवार, दिनु क्षिरसागर, सुनील पाटील, चाचा चव्हाण, प्रकाश पाटील, अशोक गुंड, बालाजी यलगुंडे आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख