वडील पवारसाहेबांमुळे, तर मी अजितदादांमुळे झेडपीवर गेलो, त्यामुळे मी आजन्म पवार गटाचाच 

निंबुत ग्रामपंचायतीचा सरपंच आरक्षणामुळे विरोधी गटाचा झाला असला तरी बहुमत आमच्या महाविकास आघाडीकडेच आहे.
I belong to Pawar group from birth : Pramod Kakade
I belong to Pawar group from birth : Pramod Kakade

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : बारामती तालुक्‍यातील निंबुत ग्रामपंचायतीचा सरपंच आरक्षणामुळे विरोधी गटाचा झाला असला तरी बहुमत आमच्या महाविकास आघाडीकडेच आहे, अशी भूमिका जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी मांडली. तसेच "मीही जन्मापासून पवार गटाचाच आहे, हे संपूर्ण परिसरास ज्ञात आहे,' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

निंबुत (ता. बारामती) ग्रामपंचायतीत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद काकडे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलला पंधरापैकी नऊ जागा मिळाल्या होत्या. विरोधी गटाच्या सोमेश्वर पॅनेलला सहा जागा मिळाल्या होत्या. सरपंचपद मात्र अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित होते. सोमेश्वर पॅनेलकडून अनुसूचित जमातीच्या एकमेव निवडून आलेल्या उमेदवार निर्मला काळे यांना सरपंचपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली. सोमेश्वर पॅनेल राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याने "पवार गटाचा निंबुत ग्रामपंचायतीत पहिलाच सरपंच' असा दावा करण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर काकडे बोलत होते. 

या पार्श्वभूमीवर प्रमोद काकडे म्हणाले, ""राज्यात जशी महाआघाडी होती, तशीच आमची राष्ट्रवादी, शेतकरी संघटना आणि शिवसेना अशी महाआघाडी होती आणि जाहीरनाम्यातही तसा उल्लेख आम्ही केलेला होता. माझे वडील 1964 पासून दोनदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठींब्यावर जिल्हा परिषद सदस्य झाले होते. मीही दोनदा जिल्हा परिषद व एकदा पंचायत समितीवर अजितदादांमुळेच निवडून गेलो आहे. त्यामुळे काहीजण आज आपणच राष्ट्रवादीचे असल्याचा दावा करत असले तरी मीच मूळ आजन्म पवार गटाचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतही राष्ट्रवादी आहे.'' 

ग्रामपंचायतीवर अल्पमतात असलेल्या गटाचे सरपंचपद आरक्षण असल्याने बिनविरोध झाले. उपसरपंचपद महाआघाडीकडून राष्ट्रवादीच्या अमरदीप काकडे यांना मिळाले आहे. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत एक मत बाद झाले, ते बहुतेक विद्यमान सरपंच यांचेच असावे, असे मतही प्रमोद काकडे यांनी व्यक्त केले. या आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. याचिकेनुसार पदनिवडीला सध्या संमती आहे. परंतु 16 मार्चला सुनावणी घेण्यात येणार आहे, त्यानंतर बदल होऊ शकतात, अशी माहितीही सभापती काकडे यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com