मी सध्या भाजपसोबत; पण भविष्यात काही गोष्टी घडल्या तर पर्याय खुले : जानकर 

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, कॉंग्रेस या सर्वच पक्षांच्या प्रमुखांसोबत माझे मैत्रीचे संबंधआहेत.
I am currently with the BJP; But if something happens in the future, the options are open : Jankar
I am currently with the BJP; But if something happens in the future, the options are open : Jankar

बारामती : मी सध्या तरी भारतीय जनता पक्षाबरोबरच आहे, त्यामुळे आतातरी माझा महाविकास आघाडीकडे कल नाही. पण, भविष्यात जर काही गोष्टी वेगळ्या घडल्या, तर सगळेच पर्याय आमच्यासमोर खुले आहेत, असे सूचक वक्तव्य करून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी "भारतीय जनता पक्षालादेखील मी माझे उपद्रवमूल्य दाखवून देणार आहे,' असा इशाराही त्यांनी दिला. 

दरम्यान, मी एका पक्षाचा प्रमुख असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, कॉंग्रेस या सर्वच पक्षांच्या प्रमुखांसोबत माझे मैत्रीचे संबंध असल्याचे सांगण्यासही जानकर विसरले नाहीत. 

बारामतीत बुधवारी (ता. 17 मार्च) संदीप चोपडे यांच्या कार्यालयात पत्रकारांशी आमदार जानकर यांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वरील माहिती दिली. ज्ञानेश्वर सलगर, माणिकराव दांगडे, ऍड. अमोल सातकर, किरण गोफणे आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्ष आगामी निवडणुकीत लक्ष केंद्रीत करणार असून किमान वीस आमदार निवडून आणण्याच्या दृष्टीने संघटना बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे, असे जानकर यांनी सांगितले. 

जानकर म्हणाले, "परभणी, जालना, हिंगोली, माढा, बारामती यासह पाच मतदारसंघावर मी लक्ष केंद्रीत करणार आहे. या मतदारसंघातील किमान वीस विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची आमदारांची संख्या वाढली, तर राज्याच्या सत्ताकारणात आमच्याशिवाय सरकारच बनणार नाही, अशी स्थिती निर्माण होईल.'' 

दरम्यान, मी सध्या आमदार असलो तरी 2024 च्या निवडणुकीत मी परभणी, माढा किंवा बारामती यापैकी एका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचेही माजी मंत्री जानकर यांनी स्पष्ट केले. 

धनगर समाज बांधवाना आदिवासीच्या 22 योजनांच्या सवलती मिळाव्यात, यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना अध्यादेश काढण्यात आला होता. त्या योजनांसाठी एक हजार कोटींची तरतूदही केली होती. मात्र, त्याच वेळेस आचारसंहिता लागली व सरकार गेले. दुर्देवाने महाविकास आघाडीच्या सरकारनेही तरतूद केलेली नव्हती. मात्र, मी सभागृहात मुद्दा मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शंभर कोटींची तरतूद यासाठी केली. या सवलती मिळण्यासाठी राजकीय दबाव तयार करावा लागेल, असेही जानकर म्हणाले. विद्यमान सरकारवर मला टीका करायची नाही; पण त्यांनी तरतूद करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com