भरणेंनी शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवावी : हर्षवर्धन पाटील यांचा हल्लाबोल

इंदापूर तालुक्यातील शेती पाणी प्रश्नी राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ये तो ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी है अशी माहिती दिली होती. त्याचा खरपूस समाचार श्री. पाटील यांनी घेतला. त्यामुळे तालुक्यात पाणी प्रश्न पुन्हा पेटला असून श्री. भरणे व पाटील या प्रश्नावर आमने सामने आले आहेत.
Harshwardhan Patil - Dattray Bharne
Harshwardhan Patil - Dattray Bharne

इंदापूर : इंदापूरचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे काही दिवसांपासून तालुक्यातशेतीच्या पाणी प्रश्नावर अपुरी माहिती देत आहेत. मंत्रिपदावरील व्यक्तीने कागदपत्रासह वस्तुनिष्ठ माहिती देणे गरजेचे आहे. गेली दीड वर्षे सत्तेवर असताना पोकळ घोषणा करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवावी, अशी टीका भाजपचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

इंदापूर तालुक्यातील शेती पाणी प्रश्नी राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ये तो ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी है अशी माहिती दिली होती. त्याचा खरपूस समाचार श्री. पाटील यांनी घेतला. त्यामुळे तालुक्यात पाणी प्रश्न पुन्हा पेटला असून श्री. भरणे व पाटील या प्रश्नावर आमने सामने आले आहेत.

 श्री. पाटील पुढे म्हणाले, ''लाकडी-निंबोडी उपसा योजनेसाठी खर्च किती येणार आहे ? अर्थसंकल्पात नक्की किती रक्कमेची तरतूद प्रस्थावित आहे, हे राज्यमंत्री सांगत नाहीत. या योजनेचे काम कधी सुरू होणार?योजनेत तालुक्यातील कोणती ११ गावे आहेत ?  शेतकऱ्यांना कधी पाणी मिळणार ? वीज बील शेतकरी भरणार की शासन भरणार ? या योजनेसाठी उजनी धरणातूनकितीपाण्याची तरतूद केली आहे ? याची काहीच माहिती न देता योजना पूर्ण झाल्याच्या आविर्भावात राज्यमंत्री पत्रकार परिषद घेवून दिशाभूल करत आहेत,''

''लाकडी-निंबोडी योजनेचा आपण स्वतः पाठपुरावा करून सन २०१० ते २०१२ मध्ये सर्वे केला व आराखडा तयार करून उजनी धरणातून १ टीएमसी पाण्याची तरतूदहीकेली होती. मात्र त्यावेळी राज्यातसिंचनघोटाळ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने तत्कालीन राज्यपाल यांनी नवीन सिंचन योजनेस परवानगी दिली नाही अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली. भाटघर, खडकवासल्याचे इंदापूर तालुक्याच्या हक्काचे पाणी सध्या शेतीसाठी राज्यमंत्री हे आमदार असताना व आता दीड वर्षे मंत्री असताना तालुक्यात देऊ शकले नाहीत, ते तालुक्यासाठी शेतीला जादा पाणी आणण्याचा प्रश्न कसा सोडवतील,'' असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.  

''उजनी धरण पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधणार अशी घोषणा दीड वर्षापासून ऐकत आहे. कधी २ तर कधी ४ बुडीतबंधाऱ्यांचा आकडा राज्यमंत्री सांगत आहेत.बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर नसताना राज्यमंत्री शेतकऱ्यांना फसवत आहेत. टाटांच्या मुळशी धरणाचे पाणी पुणे शहराला देवून पुणे शहराचे पाणी इंदापूर तालुक्याला मिळवून देऊ,असे राज्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यमंत्र्यांनी आपल्या आवाक्यात नसणाऱ्या बाबतीत धादांत फसवी वक्तव्ये करू नयेत, जनता त्यांच्या खोट्या आश्वासनांना फसणार नाही,'' असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

इंदापूर तालुक्यातील शेतीचा पाणी प्रश्न सोडविण्याच्या गप्पा मारणाऱ्याराज्यमंत्र्यांना मंत्रिपदावर आल्यानंतर दीड वर्षात साध्या भाटनिमगाव बंधाऱ्यांची दुरुस्ती करता आली नाही. बंधारा दुरुस्त न झाल्यानेपाण्याअभावी कोरडा पडला आहे. तालुक्यात निधीचा महापूर आला आहे, अशी स्वतः टिमकी वाजविणाऱ्या राज्यमंत्र्यांनीशेतकऱ्यांचीदिशाभूल करणे थांबवावे,अशी टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी केली.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com