वर्चस्वासाठी दत्तात्रेय भरणे-हर्षवर्धन पाटील पुन्हा आमने सामने 

इंदापूर तालुका हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे.
Harshvardhan Patil-Dattatreya Bharne came again Face to face on the occasion of graduate election
Harshvardhan Patil-Dattatreya Bharne came again Face to face on the occasion of graduate election

वालचंदनगर (जि. पुणे) : पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत या वेळी सर्वच राजकीय पक्षाने कमालीचे लक्ष घातले आहे. त्यातूनच एकमेकांचे कट्टर विरोधक जोमाने प्रचाराला लागले होते.

इंदापूर तालुका हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. या ठिकाणी काट्याची टक्कर कायम बघायला मिळते. निवडणूक पदवीधरच असली तरी तालुक्‍यावर वर्चस्व राखण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे पुन्हा एकदा प्रतिष्ठा पणाला लावत आमने सामने आले आहेत. 

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्तात्रेय भरणे आणि भाजपचे हर्षवर्धन पाटील हे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच आमने-सामने आले आहेत. दोघांनी सभा, बैठकांवर जोर दिला असून विधानसभा निवडणुकीप्रमाणे वैयक्तीक स्वरूपात लक्ष घातले आहे. आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक 1 डिसेंबर रोजी होणार आहे. इंदापूर तालुक्‍यात पदवीधरचे 10 हजार 858, तर शिक्षकांचे 1 हजार 224 मतदार आहेत. पुणे पदवीधर मतदार संघामधून भाजपपुरस्कृत आघाडीचे भाजपचे संग्राम देशमुख व भाजपपुरस्कृत शिक्षक परिषद संघटनेचे शिक्षक मतदार संघातून जितेंद्र पवार हे निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडाचे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड व शिक्षक मतदार संघातून जयंत आसगावकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

इंदापूर तालुक्‍यामध्ये पहिल्यांदाच पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रंगत वाढली आहे. आपापल्या उमेदवाराला मताधिक्क देण्यासाठी भरणे व पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बरोबर घेवून गावोगावी घोंगडी बैठका घेतल्या जात आहेत. आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. 

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पारंपारिक प्रचाराबरोबर हायटेक प्रचारावर जोर दिला असून सोशल मीडियावर प्रचाराची रंगत वाढली आहे. दोघांनी जातीने लक्ष घातले आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना वर्चस्व दाखवायचे आहे. 

इंदापूर तालुक्‍यात पाच ठिकाणी मतदान करता येणार 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक 1 डिसेंबर रोजी होणार आहे. तालुक्‍यात इंदापूर, निमगाव केतकी, सणसर, भिगवण व बावडा  या पाच ठिकाणी 21 बूथ तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com