शिवसेनेतील बंडामागे मोठ्या नेत्याचा हात....

अविश्वास ठरावावर सह्या करणारे शिवसेनेचे सदस्य यापुढील काळात शिवसेनेत राहणार नाहीत, असाही कयास वर्तविण्यात येत आहे.
The hand of a big leader from Khed behind the rebellion in Shiv Sena
The hand of a big leader from Khed behind the rebellion in Shiv Sena

राजगुरूनगर (जि. पुणे) : खेड (Khed) पंचायत समितीचे शिवसेनेचे (Shiv Sena) सभापती भगवान पोखरकर (Bhagwan Pokharkar) यांच्या विरोधात पक्षाच्याच सदस्यांनी बंड केले आहे. सभापती पोखरकर यांच्या विरोधात त्यांनी अविश्वास ठराव (No-confidence resolution) दाखल केला आहे. ठरावाच्या सूचक ह्या शिवसेनेच्या सुनीता सांडभोर असल्या तरी त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) चारही सदस्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे या बंडाला राष्ट्रवादीची फूस असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (The hand of a big leader from Khed behind the rebellion in Shiv Sena)

दरम्यान, या अविश्वास ठरावामागे खेड तालुक्यातील मोठ्या नेत्याचा हात असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या अविश्वास ठरावावर सह्या करणारे शिवसेनेचे सदस्य यापुढील काळात शिवसेनेत राहणार नाहीत, असाही कयास वर्तविण्यात येत आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीला अवघे आठ ते दहाच महिने उरले असल्याने कारवाईचीही चिंता त्यांना नाही. निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने आपला गट जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविला नसल्याने शिवसेनेचा व्हीपही सदस्यांवर कायद्याने बंधनकारक राहणार नाही, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या ठरावाला पंचायत समितीच्या एकूण १४ पैकी ११ सदस्यांचा पाठिंबा असल्याची माहिती आहे. कारण, त्या ठरावाच्या बाजूने अकराने जणांनी सह्या केलेल्या आहेत. हे सर्व ११ जण सहलीवर गेले आहेत. खेड पंचायत समितीत शिवसेनेचे ८ सदस्य असून त्यांना कॉंग्रेसच्या एका व भाजपच्या एका सदस्याने आजपर्यंत पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहात ४ सदस्य आहेत. म्हणजेच शिवसेनकडे पूर्ण बहुमत असतानाही सभापतींवर अविश्वास ठराव दाखल झाला आहे. त्यामुळेच त्याची चर्चा रंगली आहे.

या प्रकारामुळे शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले असून नेत्यांचा सदस्यांवर वचक राहिलेला नाही, हे उघड झाले आहे. कारण, मागील सभापती, उपसभापती निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या काही सदस्यांनी वेगळी भूमिका घेतलेली होती. 

राज्यात महविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र असले तरी पुणे जिल्ह्यात, विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षामधून विस्तवही जात नाही. खेड तालुक्यात हे दोन पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. खेड पंचायत समितीच्या इमारतीवरून हे दोन्ही पक्ष गेली वर्षभरापासून एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत.

सभापती भगवान पोखरकर यांनी थेट आमदार दिलीप मोहिते यांच्याविरोधात विरोधात भूमिका घेत पंचायत समितीची इमारत त्या जागेवर होऊ देणार नसल्याचे म्हटले होते. त्यावर आमदार मोहिते यांनीही पोखरकर यांना जाहीररित्या फटकारत सभापती होण्यासाठी ते माझ्या पाया पडायला आले होते आणि सभापती होताच त्यांची भाषा बदलली, असा हल्लोबाल त्यांनी केला होता.

एकंदरीतच या अविश्वास ठरावाला शिवसेना-राष्ट्रवादीमधील वादाची किनार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच शिवसेनेने निवडून आल्यानंतर आपल्या गटाची नोंदणी न केल्याने शिवसेना सदस्यांनाही बंडासाठी सोयीचे ठरले आहे.

या सर्व प्रकारावर शिवसेनेचे खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. ते म्हणातात की अविश्वास ठरावच्या विषयावर मी आताच काही प्रतिक्रिया देणार नाही. कारण, हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठच याबाबत प्रतिक्रिया देतील किंवा आम्हाला काहीतरी आदेश देतील. त्यामुळे हा वाद आता वरिष्ठ पातळीपर्यंत पोचला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com