निवडणुकीतील प्रचार पोलिस पाटलांना भोवला 

बारामतीच्या प्रांताधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती
 Ghorpadwadi police Patil suspended .jpg
Ghorpadwadi police Patil suspended .jpg

वालचंदनगर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील प्रचारामध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी घोरपडवाडी (ता. इंदापूर) येथील पोलिस पाटील नंदकुमार लावंड यांना बारामतीच्या (Baramati) प्रांताधिकाऱ्यांनी पोलिस पाटील (Police Patil) पदावरून निलंबित केले. (Ghorpadwadi police Patil suspended)  

घोरपडवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जानेवारीमध्ये झाली आहे. पोलिस पाटील लावंड यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभाग घेतल्याची ऑडिओ क्लीप निवडणुकीच्या निकालानंतर व्हायरल झाली. गावच्या राजकारणामध्ये सहभाग घेतल्याच्या कारणावरून त्यांचे निलंबित करण्यासंदर्भात घोरपडीवाडी येथील गजानन लंबाते यांच्यासह ग्रामस्थांनी २२ जानेवारी रोजी बारामतीच्या प्रांताधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती. 

मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने २ ऑगस्ट २०२१ रोजी गजानन लंबाते, अमोल कांबळे, गोरख खंडागळे यांच्यासह इतरांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. अखेर बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सोमवारी (ता. २ ऑगस्ट) लावंड यांचे निलंबन केले. तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना दिले. 

मॅटमध्ये जाणार : लावंड 

यासंदर्भात घोरपडवाडीचे निलंबित पोलिस पाटील नंदकुमार लावंड यांनी सांगितले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी सहभाग घेतला नाही. बारामतीचे प्रांताधिकारी यांनी शहानिशा केली नाही. माझी बाजू ऐकून न घेताच कसल्याही प्रकाराची चौकशी न करता राजकीय दबावापोटी एकतर्फी निलंबन केले आहे. या निर्णयाच्या विरोधात ‘मॅट’मध्ये जाणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com