गडकरींचे शिरूर-दौंडला गिफ्ट : शिक्रापूर-चौफुला रस्त्यासाठी आणखी २६ कोटी मंजूर 

तत्कालीन आमदार बाबूराव पाचर्णे यांनीही या महामार्गावरील स्थानिकांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने दिल्ली वाऱ्या केल्या होत्या.
Gadkari's gift to Shirur-Daund: Another Rs 26 crore sanctioned for Shikrapur-Choufula road
Gadkari's gift to Shirur-Daund: Another Rs 26 crore sanctioned for Shikrapur-Choufula road

पुणे  ः पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते दौंड तालुक्यातून जाणाऱ्या केडगाव-चौफुला या राष्ट्रीय महामार्ग ५४८ नंबरच्या रस्त्याच्या दरम्यान असलेल्या छोट्या पुलांसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी २६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीला मंजुरी दिली आहे. ही माहिती गडकरी यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे.

मुंबई-चाकण-शिक्रापूर-जामखेड हा मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी नंबरने घोषीत झाला आहे. यानंतर तळेगाव दाभाडे ते शिक्रापूर रस्ता सहापदरी करण्यासाठी तसेच शिक्रापूर ते केडगाव चौफुला रस्ता चारपदरी करण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (NHAI : National Highway Authority of India) वतीने सुमारे 1800 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यात आला होता. 

त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सचिव सु. दे. चिटणीस, राजीव सिंग व डी. ओ. तावडे आदी स्थानिक पातळीवरील माहिती लोकप्रतिनिधींकडून संकलन करीत होते. तत्कालीन आमदार बाबूराव पाचर्णे यांनीही या महामार्गावरील स्थानिकांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने दिल्ली वाऱ्या केल्या होत्या. त्यालाच अनुसरुन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे महाराष्ट्र राज्य मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्याकरवी 46 कोटींचे अंदाजपत्रक रस्ते व वाहतूक मंत्रालयाला (MORTH- ministry of road transport & highways सादर केले होते.

त्या कामाची निविदा प्रक्रिया 14 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करून निविदा प्रक्रियेत 17 ठेकेदारांनी भाग घेतल्यानंतर राजेंद्रसिंह भांबू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जयपूर यांच्या कमी दराच्या निविदेने त्यांना तत्काळ कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया राबवली गेली होती. 

दरम्यान, त्याच कामातील जामखेड रस्त्याच्या अलिकडील (शिरूर-पुणे कडील) भाग असलेले न्हावरे-तांदळी-आढळगाव या 49 किलोमीटर रस्त्याचे दहा मीटर रुंदीचे कॉंक्रिटीकरणाचे 300 कोटी रुपयांचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे.

तळेगाव ढमढेरेमार्गे बीडकडे जाणाऱ्या वाहनांना हा उत्तम मार्ग लवकर उपलब्ध होईल, असे नियोजन आहे. याच अनुषंगाने दोन टप्प्यातील पहिल्या टप्प्यात रुंदीकरणासाठी ४६ कोटींची मंजुरी गडकरी यांनी दिली होती. आता याच संपूर्ण महामार्गांवरील छोट्या पुलांसाठी २६ कोटी रुपयांच्या कामांसाठीचा निधी मंजूर केल्याची माहिती गडकरी यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com