डॅाक्टरने कोरोना रुग्णाकडून अवाजवी रक्कम उकळली; पुणे जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल

त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.
Fraud case filed against Criticare Hospital at Chakan .jpg
Fraud case filed against Criticare Hospital at Chakan .jpg

पिंपरी : राज्यामध्ये कोरोना (Kovid-19) उपचारासाठी सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त बिल वसूल केल्यामुळे चाकण येथील क्रिटीकेअर रुग्णालायाच्या (Criticare Hospital) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ ते ९ सप्टेंबर दरम्यान, चाकणमध्ये हा प्रकार घडला आहे. (Fraud case filed against Criticare Hospital at Chakan)

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांती अवाजवी बीले दिले असल्याच्या तक्रारी आल्यानंतर खासगी रुग्णालयातील बिलांची तपासणी केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली होती. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. चाकण येथील रुग्णालायने शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अवाजवी दर आकारून 2 लाख 53 हजारांची रक्कम उकळल्या प्रकरणी आणि वारंवार सांगूनही ती रक्कम परत न केल्यामुळे क्रिटीकेअर रुग्णालयाचे संचालक संचालक डॉ. घाटकर डॉ. स्मिता घाटकर, डॉ. राहुल सोनवणे आणि डॉ. सीमा गवळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॅा. नंदा गणपत ढवळे (वय ५८) यांनी शनिवारी चाकण पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण क्रिटीकेअर रुग्णालयामध्ये कोरोना रुग्ण विजय लक्ष्मण पोखरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर या रुग्णालयाने उपचाराचे बिल सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक वसूल केले. याबाबत वैद्यकीय अधिक्षक नंदा ढवळे यांनी रुग्णालयाच्या संचालकांना रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे परत करण्यास वारंवार सांगितले. मात्र, चंचालकांनी पुष्पा विजय पोखरकर यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणचा अधिक तपास चाकण पोलिस करत आहेत. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com