बारामतीत हनीट्रॅप...दोन महिलांसह पोलिस जेरबंद 

महिलांच्या मदतीने व्हॉटसअँपवर मेसेज पाठवून हनीट्रॅपमध्ये अडकवून पैसे लुबाडणार्याचौघांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली.
Baramati honeytrap .jpg
Baramati honeytrap .jpg

बारामती : महिलांच्या मदतीने व्हॉटसअँपवर मेसेज पाठवून हनीट्रॅपमध्ये अडकवून पैसे लुबाडणार्या चौघांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली. यात मुंबई पोलिस दलातील एका बडतर्फ पोलिसासह दोन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महिला दिनी महिला पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी महिला दिनाच्या दिवशी (ता. 8 मार्च) महिला कर्मचार्यांकडे पोलिस ठाण्याचा कार्यभार सोपविला होता. बारामतीतील कमला शंकर पांडे (रा. अशोकनगर, बारामती) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी स्मिता दिलीप गायकवाड (रा. फलटण, जि. सातारा), मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस कर्मचारी आशिष अशोक पवार (रा. भुईंज, ता. वाई, जि. सातारा), सुहासिनी योगेश अहिवळे (रा. मंगळवार पेठ, फलटण, जि. सातारा) व राकेश रमेश निंबोरे (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) या चौघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.  

नामदेव शिंदे माहिती देताना म्हणाले की, आशिष पवार हा बडतर्फ पोलिस या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे, सावज हेरून स्मिता गायकवाड हिच्या मोबाईलवरुन ओळख निर्माण करुन, त्यांना फलटणला बोलावून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, असे धमकावून त्यांच्याकडून पैसे लुटणे अशी यांची कार्यपध्दती होती. कमला पांडे यांच्याकडूनही त्यांनी दहा लाखांची मागणी केली होती, मात्र त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी अश्विनी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. या सापळ्यात हे चौघेही अलगद सापडले. 

यातील राकेश निंबोरे याच्यावर या पूर्वी खंडणी, दरोडा, पोलिसांवर हल्ला करणे, अपहरण असे अकरा गुन्हे दाखल असून तो आपले नाव गुरु काकडे असे सांगायचा. बारामती बसस्थानकावर वीस हजारांची खंडणी स्विकारताना पोलिसांनी राकेश निंबोरे याला ताब्यात घेतल्यानंतर इतर तिघांची नावे चौकशीत निष्पन्न झाली. त्या नंतर त्या तिघांनाही पोलिसांनी जेरबंद केले. पोलिस कर्मचारी सागर देशमाने, अतुल जाधव, अंकुश दळवी, अजित राऊत, दशरथ इंगुले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. 

तक्रारदारांनी समोर यावे...

अशा काही प्रकरणात कोणाची फसवणूक झाली असल्यास न घाबरता लोकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी पोलिस त्यात कारवाई करतील असे आवाहन नामदेव शिंदे यांनी केले. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com