सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपद भूषविलेल्या सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

या दोघा भावांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु होते.
Former Sarpanch of Varnavad Gunaji Randhir and former Gram Panchayat member Janardan Randhir passed away due to corona
Former Sarpanch of Varnavad Gunaji Randhir and former Gram Panchayat member Janardan Randhir passed away due to corona

वरवंड (जि. पुणे) : दौंड तालुक्यातील वरवंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुणाजी रणधीर (वय 58) आणि त्यांचे भाऊ, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जनार्दन रणधीर (वय 69) या सख्या भांवडांचा दहा दिवसांच्या अंतरात कोरोनामुळे मृत्यू झाला. माजी सरपंच गुणाजी रणधीर यांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज गुरुवारी (ता. 29 एप्रिल) रात्री अपयशी ठरली, तर त्यांचे थोरले बंधू, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जनार्दन रणधीर यांचा दहा दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 

वरवंड परिसरात मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे. कोरोना संसर्गाचा कौटुंबीक प्रसार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येने ग्रामपंचायत व आरोग्य विभागही हादरला आहे. गावात मृत्यूदर वाढत चालल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मागील पंधरा दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुणाजी धोंडीबा रणधीर यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना वरवंड येथील कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. जास्त त्रास जाणवू लागल्याने पुढील उपचारासाठी त्यांना हाॅस्टपीटलमध्ये हलविण्यात आले होते. या दरम्यान त्यांचे थोरले बंधू, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जनार्दन रणधीर यांनाही कोरोनाची बाधा झाली. या दोघा भावांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु होते. जनार्दन रणधीर यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.

त्यानंतर दहा दिवसांनंतर गुरुवारी (ता. 29 एप्रिल) रात्री गुणाजी रणधीर त्यांची प्राणज्योत मावळली. गुणाजी यांनी 2005 ते 2010 या दरम्यान सलग पाच वर्षे वरवंडचे सरपंचपद भूषविले होते, तर त्यांचे बंधू जनार्दन रणधीर 2015 ते 2020 कालावधीच्या दरम्यान ग्रामपंचायत सदस्य होते. दहा दिवसांच्या फरकाने दोन्ही सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माजी सरपंच गुणाजी रणधीर यांचा स्वभाव विनोदी शैलीचा होता. घरातून बाहेर पडताच भेटणाऱ्या लहान-थोरांना अगदी वाकून नमस्कार करण्याची त्यांची शैली परिसरात प्रसिद्ध होती. त्यांच्या मृत्यूने अनेकांची मने गहिवरुन आली. विनोदी, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा सरपंच परत न होणे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com