माजी आमदार सूर्यकांत पलांडे, जयश्री पलांडे यांना धक्का देत धुमाळ-पलांडे गटाची हट्‌ट्रीक 

विशेष म्हणजे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी निवडणुकीवेळी स्वत: गावात कंबर कसली होती.
Former MLA Suryakant Palande, Jayashree Palande's group lost in the Gram Panchayat elections
Former MLA Suryakant Palande, Jayashree Palande's group lost in the Gram Panchayat elections

पुणे : शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे आणि पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे यांना मुखई (ता. शिरूर) गावात धक्का बसला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पलांडे-धुमाळ गटाने युती करत या दोन्ही नेत्यांना हरवून सत्ता मिळविली आहे. याच गटाचे सरपंच आणि उपसरपंच झाले आहेत. विशेष म्हणजे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी निवडणुकीवेळी स्वत: गावात कंबर कसली होती. परंतु त्यांच्या विरोधात ग्रामपंचायत गेल्याने तो तालुका आणि जिल्ह्यात विषय झाला आहे. 

शिरूर तालुक्‍यातील मुखई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती सचिन पलांडे, तर उपसरपंचपदी रमेश रामचंद्र पलांडे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत सूर्यकांत पलांडे आणि जयश्री पलांडे यांच्या पॅनेलच्या विरोधातील काळभैरवनाथ ग्रामविकास आघाडीने 9 : 3 असा विजय मिळविला. काळभैरवनाथ ग्रामविकास आघाडीने सरपंच आणि उपसरपंच निवडी माजी सरपंच अतुल धुमाळ, ऍड. सुरेश पलांडे, सचिन पलांडे, सुरेश रामराव पलांडे, खुशालराव पलांडे-पाटील, सुदाम थोरवे यांच्या सुचनेनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे मुखईवर सलग तिसऱ्यांदा धुमाळ-पलांडे गटाची सत्ता कायम राखली आहे. 

सूर्यकांत पलांडे आणि जयश्री पलांडे यांच्या पॅनेलच्या विरोधात माजी सरपंच अतुल धुमाळ, ऍड. सुरेश पलांडे, सचिन पलांडे, सुरेश रामराव पलांडे यांच्या समर्थकांच्या पॅनेलची झालेली लढत शिरुर तालुक्‍यासाठी लक्षवेधी ठरली होती. अत्यंत तुल्यबळ लढतीत दोन्ही बाजूंनी प्रचारकाळात अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. 

याच पार्श्वभूमिवर मागील पंचवार्षिकच्या पॅनेलमध्ये अनेक इनकमिंग-आउटगोईंग होवून निवडणूक रंगतदार अवस्थेत पोचली होती. मात्र, नागरिकांनी धुमाळ-पलांडे गटाला 9 जागा मिळाल्या, तर सूर्यकांत पलांडे आणि जयश्री पलांडे यांच्या गटाला 3 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे धुमाळ-पलांडे गटाने सलग तिसऱ्यांदा सत्ता प्रस्थापित केल्याने सरपंचपदी पॅनेलप्रमुख सचिन पलांडे यांच्या पत्नी ज्योती पलांडे, तर दुसरे पॅनेलप्रमुख ऍड. सुरेश रामचंद्र पलांडे यांचे बंधू रमेश पलांडे उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. 

या निवडीनंतर ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात सरपंच ज्योती पलांडे, उपसरपंच रमेश पलांडे या दोघांसह संयोगिता पलांडे, वर्षा रामगुडे, शहाणूर काळे आदींचा सत्कार पॅनेलप्रमुखांसह ज्येष्ठ गावकारभारी खुशालनाना पलांडे, रामभाऊ वारे, भाऊ आगसकर, नितीन थोरवे, अशोक गरुड, माजी सरपंच पद्मा पलांडे, स्वाती धुमाळ, कविता थोरवे, सुनीता सरमाने, सुनीता गरुड आदींच्या हस्ते करण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com