शिवसेनेच्या माजी मंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर...

आरोग्य सुविधांबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवतारे यांनी निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
 Vijay Shivtare .jpg
Vijay Shivtare .jpg

पुणे : पुरंदर मतदार संघात रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि आरोग्य सुविधा मिळत नसल्याने संतप्त झालेले, शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. आरोग्य सुविधांबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवतारे यांनी निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देत, त्यांनी सरकारला घराचा आहेर दिला. 

या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रेमडेसिव्हीर मिळत नाही म्हणून रुग्णांचे नातेवाईक जमा झाले होते. त्यांचीही भेट शिवतारे यांनी घेतली. या वेळी माध्यमांशी बोलतांना शिवतारे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात माझी भूमिका नाही. प्रशासनाच्या भूमिकेवर माझी नाराजी आहे. जिल्हाधिकारी आणि FDA यांच्या कारवाईवर संशय असल्याचे शिवतारे म्हणाले.

पुरंदर मध्ये १८०० रुग्ण आहेत, रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन फक्त २२५ मिळाले आहेत. लसीकरणबाबतीत आमच्यावर अन्याय झाला आहे. पुरंदरमध्ये जास्त धोका असतांना फक्त ३४ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले. इतर जिल्ह्यात मात्र दुपटीने लसीकरण झाले. प्रशासनाकडे २०० बेड साठी परवानगी मिळावी यासाठी विनंती केली आहे.  

ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करावा अशी मागणी केली आहे. आमच्याकडे इथेनॉल प्लॅट आहे. त्यामध्ये जागा आहे, तिथे ऑक्सिजन प्लांट ची परवानगी दिली पाहिजे. कोव्हीड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जाते. प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग सुरू असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. 

प्रशासन चांगले काम करत आहे, पण आमच्याकडे दुजाभाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सम प्रमाणात सगळ्या गोष्टींचे वाटप करावे, मला राजकारणावर बोलायचे नाही. आमच्या आमदारांवर मी काहीही बोलणार नाही, असेही शिवतारे म्हणाले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com