पंचायत समितीच्या माजी सदस्याने सुपारी देऊन घडविला एकेकाळच्या सहकाऱ्यावर हल्ला 

कोऱ्हाळे व घोडेकर हे काही काळ जिवलग मित्र होते.
Former Junnar Panchayat Samiti member arrested in attack case
Former Junnar Panchayat Samiti member arrested in attack case

नारायणगाव (जि. पुणे) : जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव येथील जमीन खरेदी विक्री एजंट संग्राम जगन्नाथ घोडेकर (वय 55) यांच्यावर झालेला खुनी हल्ला आर्थिक देवाणघेवाण व स्थावर मालमत्तेच्या वादातून सुपारी देऊन झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी मुख्य सूत्रधार व माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे (वय 61, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) याला आज (ता. 8 जानेवारी) अटक केली असून, इतर चार आरोपी फरारी आहेत. 

स्थानिक गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास केला असता या घटनेचा मुख्य सूत्रधार कोऱ्हाळे असल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. 

याबाबत नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी माहिती दिली की, या घटनेचा नारायणगाव पोलिसांनी सहा तासांत तपास करून सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक केली. प्रशांत माने (वय 38, रा. नारायणगाव), साईल शेख (वय 18, रा. नारायणगाव), सोन्या राठोड (वय 24, रा. चौदा नंबर, ता. जुन्नर), भावेश राजेंद्र लेंडे (वय 20, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) हे फरारी झाले आहेत. 

संग्राम घोडेकर यांच्यावर गुरुवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने खुनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्या आधारे आरोपी निष्पन्न होण्यास मदत झाली. 

कोऱ्हाळे व घोडेकर हे काही काळ जिवलग मित्र होते. कोऱ्हाळे याचे जमीन खरेदी विक्रीचे व स्थावर मालमत्तेचे आर्थिक व्यवहार घोडेकर पाहत होते. येथील ग्रामीण रुग्णालयाजवळच्या जमिनीच्या व्यवहारात मिळालेल्या पैशावरून व कुबेर मधुकोश सोसायटीमधील वादग्रस्त रो हाउसच्या ताब्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून घोडेकर यांनी कोऱ्हाळे यांच्या गैरकारभाराची माहिती नुकतीच प्रसारित केली होती. त्यावरून कोऱ्हाळे याने घोडेकर यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी राठोड, शेख व लेंडे यांना दिली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी घोडेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला करून ते तिघे फरारी झाले. या कामात माने याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहेत. 

या गुन्ह्यात अजून काही व्यक्तींचा सामावेश असल्याची शक्‍यता आहे. फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. याबाबतचा तपास पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलिस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

या घटनेचा तातडीने तपास केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैर, सरपंच योगेश पाटे यांनी पोलिस निरीक्षक गुंड यांचा सत्कार केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com