साधना बॅंकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर व त्यांच्या पत्नीस दरोडेखोरांकडून बेदम मारहाण 

या पळापळीत चोरट्याने ओरबडलेले कुसुम यांचे दागिने व चोरट्यांची कांही हत्यारे दरवाजात पडल्याचे काळभोर यांना आढळून आले.
Former chairman of Sadhana Bank Subhash Kalbhor and his wife beaten by robbers
Former chairman of Sadhana Bank Subhash Kalbhor and his wife beaten by robbers

लोणी काळभोर (जि. पुणे)  ः साधना सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुभाष काशिनाथ काळभोर (वय ७५) व त्यांच्या पत्नी कुसुम यांना चार ते पाच दरोडेखोरांनी बुधवारी (ता. १४ एप्रिल) पहाटे घरात घुसुन बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी सुभाष काळभोर यांच्या प्रमाणेच लोणी काळभोर (ता. हवेली) हद्दीत आणखी पाच ठिकाणी धुडगुस घातल्याचे निष्पन्न झाले आहे. 

आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या सुभाष काळभोर यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याला घरात घुसुन मारहाण केल्याच्या घटनेस अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी उलटूनही, लोणी काळभोर पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

दरम्यान, नागरीकांनी पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क केल्यास, सात मिनिटांच्या आत पोलिस मदतीला येतील असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उरुळी कांचन येथे पाच दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, सुभाष काळभोर यांना मारहाण होऊन अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी उलटूनही लोणी काळभोर पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

साधना सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान जेष्ठ संचालक सुभाष काळभोर हे कुटुंबासह लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पांढरीमळा येथे राहतात. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दरवाजा उचकटून घरात शिरलेल्या दोन चोरट्यांनी सुभाष काळभोर व त्यांची पत्नी कुसुम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीला सुभाष काळभोर यांनी प्रतिसाद दिल्याने, दोघापैकी एका चोरट्याने कुसुम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात सुभाष काळभोर व त्यांच्या पत्नी कुसुम या दोघांनाही जबर मारहाण झाली.

सुभाष काळभोर यांचा प्रतिकार कमी होताच, दोघांनी कुसुम यांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेले. त्याचवेळी वरच्या मजल्यावर झोपलेले सुभाष काळभोर यांचा मुलगा नंदू काळभोर जागे झाले. नंदू काळभोर व त्यांच्या पत्नी खाली येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली.

दरम्यान, नंदु काळभोर यांनी पळुन जाणाऱ्या एका चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटा हाताला हिसडा मारुन पळून जाण्यात यशस्वी ठरला. नंदू काळभोर व सुभाष काळभोर त्याही स्थितीत घराबाहेर आले असता, तब्बल पाच जण घरापासून दूर पळून जात असल्याचे दिसून आले.

या पळापळीत चोरट्याने ओरबडलेले कुसुम यांचे दागिने व चोरट्यांची कांही हत्यारे दरवाजात पडल्याचे काळभोर यांना आढळून आले. प्रसंग बिकट असल्याने सुभाष काळभोर यांनी तत्काळ पावणे चारच्या सुमारास लोणी काळभोर पोलिसांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर अर्धातासानंतरही पोलिस येत नसल्याचे लक्षात आल्याने, काळभोर यांनी सव्वाचारच्या सुमारास शंभर नंबरवर फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मात्र दहा मिनिटांत दोन पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले व माहिती घेऊन गेले. 

याबाबत अधिक बोलतांना सुभाष काळभोर म्हणाले, बुधवारी पहाटे झालेल्या मारहानीची माहिती देऊनही, लोणी काळभोर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. घटना घडल्यानंतर आलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी किरकोळ मारहान झाल्याचे मलाच सांगुन, गप्प राहण्याची विंनंती केलेली आहे. बुधवारी पहाटे माझ्याप्रमानेच माझे स्नेही राजु चौधरी व गावातील आनखी पाच घरात वरील पाच जनांनी गोंधळ घातलेला आहे. याबाबतचे सिसीटीव्ह फुटेजही चौधरी यांच्याकडे उपलब्द आहे. राजु चौधरी यांच्या घरातुन रोख रक्कम चोरीस गेल्याने, राजु चौधरी यांची तक्रार नोंदवुन घेतली असली तरी, अद्याप कोणत्याही प्रकारचा तपास पुढे झालेला नाही. ही बाब अतिशय गंभीर असुन आहे. 


जबाबदारी टाळणाऱ्यांवर कारवाई करणार  : वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी

लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले, राजेंद्र चौधरी यांच्या घरी झालेल्या चोरीचीच माहिती पोलिसांनी मला दिली आहे. मात्र, सुभाष काळभोर व त्यांच्या पत्नीला झालेल्या मारहाणीची माहिती पोलिसांनी मला दिलेली नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. बुधवारी पहाटे ड्यूटीवर कोणकोण होते व सुभाष काळभोर यांच्या घरी कोण कोण गेले होते. त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रार का दाखल केली नाही, याची माहिती पुढील काही तासात घेणार आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, सुभाष काळभोर व इतरांची भेट घेऊन याबाबतची माहिती घेत पुढील तपास करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com