शिवसेना तालुकाप्रमुखावर गुन्हा दाखल 

घडलेल्या गुन्ह्यांचेही गुन्हे दाखल करु नयेत का? अशी विचारणा आता शिक्रापूर पोलिस खाजगीत करीत आहेत.
 Filed a case against Shiv Sena taluka chief .jpg
Filed a case against Shiv Sena taluka chief .jpg

शिक्रापूर : आपले मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांवर आकसाने गुन्हे दाखल होतात हे शिक्रापूर (ता.शिरूर) येथील कार्यक्रमात जाहीर सांगणाऱ्या शिरुर शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे (Sudhir Farate) यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी पक्षमेळावा घेवून कोरोना नियम पायंदळी तुडविल्याबद्दल गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसैनिकांवरील गुन्ह्यांबाबतचा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्याची वल्गना केली होती. मात्र, राऊतांनी शिक्रापूर सोडून ते मुंबईत पोहचताच इकडे तालुकाप्रमुख फराटे यांच्यावर गुन्हा दाखल केला. (Filed a case against Shiv Sena taluka chief) 

आमदार अशोक पवारांना केंद्रस्थानी ठेवून झालेल्या शिक्रापूरातील शिरुर-हवेली शिवसेना मेळाव्यात सर्वांनीच पवार यांच्या नावाने त्यांचा नामोल्लेख टाळून तोंडसुख घेतले. मात्र, या कार्यक्रमाला दोन्ही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाल्याने शिक्रापूर पोलिसांनी आयोजक असलेले शिरुर तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांच्या विरुध्द कोरोना नियमांची पायमल्ली, जिल्हाधिका-यांचा अध्यादेश डावलणे व सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्याबद्दल गुन्हा दाखल केल्याची माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.  

घडलेल्या गुन्ह्यांचेही गुन्हे दाखल करु नयेत का? अशी विचारणा आता शिक्रापूर पोलिस खाजगीत करीत आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या स्पष्ट सुचना आहेत की, घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याची नोंद घ्यायला हवी. त्याच अनुषंगाने शिक्रापूरात थेटपणे शेकडो लोकांना गोळा करुन प्रशासनाला आव्हान दिले जात असेल तर कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असोत गुन्हे दाखल होणारच अशी प्रतिक्रियाही शिक्रापूर पोलिसांच्या वतीने एका कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने 'सरकारनामा'शी बोलताना दिली. 

फराटेंच्या विरोधात काहींचे राजिनामे..?

विशिष्ट जातीच्या कार्यकर्त्यांना पदे द्यायची आणि अन्य जातीय मंडळींना शिवसेनेतील महत्वाच्या पदावरुन दूर करायचे, अशा काही हालचाली शिरुर शिवसेनेत चालल्याची खात्रीलायक माहिती काही शिवसैनिकांनी पत्रकारांना शिक्रापूरच्या कार्यक्रमाआधी दिली होती. शिवसेनेत जात पाहून पदे देण्याची प्रथा सुरू होत असल्याची चर्चाही पुणे जिल्हा शिवसेनेत आहे. याच पार्श्वभूमिवर शिक्रापूरचा कार्यक्रम पार पडताच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी फराटे हटाव म्हणून मोहिम उघडल्याची खात्रीलायक माहिती असून फराटे हे केवळ विशिष्ट जातीच्या मंडळींना पदे देण्यासाठी कार्यरत असल्याने त्यांना हटविण्यासाठी सदर राजिनामे वरिष्ठांकडे दिल्याची माहितीही या मंडळींनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com