लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातुन दोन गटात तुंबळ हाणामारी

लोणी काळभोर ग्रामपंचायतीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला असतानाच, निवडणुकीला गालबोट लागले. निवडणुकीच्या वादातुन महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर या दोन गटात मंगळवारी (ता. १२) मध्यरात्रीच्या समारास लोखंडी गज, व लाकडी दांडके यांच्या साह्याने दोन तासाहुन अधिक काळ तुंबळ हाणामारी झाली.
Police Taking root March in Loni Kalbhor
Police Taking root March in Loni Kalbhor

उरुळी कांचन (पुणे)- लोणी काळभोर ग्रामपंचायतीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला असतानाच, निवडणुकीला गालबोट लागले. निवडणुकीच्या वादातुन महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर या दोन गटात मंगळवारी (ता. १२) मध्यरात्रीच्या समारास लोखंडी गज, व लाकडी दांडके यांच्या साह्याने दोन तासाहुन अधिक काळ तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील हाणामारी सोडविण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी लाठीचार्जही केला. 

दरम्यान दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी  तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल बावीस जनांच्या विरोधात दंगलींचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गटाच्या हाणामारीत दोन चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, दोन्हीकडील कार्य़क्त्यांच्या गळ्यातील साडेआकरा तोळे सोन्याचे दागिने गहाळ झाल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.  

या प्रकरणी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर गटाच्या शुभम तात्यासाहेब काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अष्टविनायक पॅनेलचे प्रमुख प्रशांत दत्तात्रय काळभोर, राज उर्फ विशाल प्रताप काळभोर, गुरूदेव दत्तात्रय काळभोर, सौरभ दयानंद काळभोर, शुभम विलास काळभोर, निखील धोंडीबा काळभोर, वैभव आनंदा काळभोर, रोहीत गिरी, निलेश धोंडीबा काळभोर, शुभम प्रदिप क्षीरसागर व सिध्देश्वर प्रदिप क्षीरसागर या अकरा जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर प्रशांत काळभोर गटाच्या सौरभ दयानंद काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्यासह युवराज रामचंद्र काळभोर,  गणेश सुखदेव काळभोर, नितिन ज्ञानोबा काळभोर, आदित्य तुपे, किशोर मदणे,  सीताराम लांडगे, सुभाष काळभोर, प्रवीण राजाराम काळभोर, अमित माणिक काळभोर, शुभम  तात्यासाहेब काळभोर या अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांसाठी पंचवार्षिक निवडणुक येत्या शुक्रवारी (ता. १५) होणार आहे. या निवडणुकीसाठी यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी जिल्हा परीषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व हवेली तालुका कॉग्रेसचे (आय) चे माजी अध्यक्ष शिवदास काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परीवर्तन पॅनेल व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर व लोणी काळभोरचे माजी सरपंच शऱद काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अष्टविनायक पॅनेल या दोन पॅनेलमध्ये सरळ लढत आहे. दोन्ही गटांनी निवडणुक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड व भेद या नितीचा वापर सुरु केला आहे. 

यातुनच मंगळवारी वारी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाषानकर बागेत भांडणाचा भडका उडाला. महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांचे पाषानकर बागेत जनसंपर्क कार्यालय असुन, या कार्यालयावर प्रशांत काळभोर यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याने, वरील प्रकार झाल्याचा आरोप राहुल काळभोर गटाने केला आहे. 

दोन्ही पॅनेलच्या प्रचार सभा रद्द करण्याचे आदेश

याबाबत अधिक बोलतांना लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, माधव काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परीवर्तन पॅनेल व प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखाली अष्टविनायक पॅनेल या दोन्ही  पॅनेलच्या कार्यकर्त्यात मंगळवारी रात्री उशीरा हाणामारी झालेली आहे. 

या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार, दोन्ही गटातील तब्बल बावीस जणांच्या विरोधात दंगलींचा गुन्हा दाखल केला आहे. हानामारीचे सिसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले आहे. यामुळे भांडणे नेमकी कोणी सुरु केली याचा तपास चालु आहे. रात्रीच्या प्रकारामुळे पुढील दोन वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांच्या प्रचार सभांना परवानगी नाकारली आहे. गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असुन, यापुढील काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिसांना गडबड करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सुचनाही दिलेल्या आहेत. 

पोलिसांचे संचलन

दरम्यान लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी रात्री घडलेल्या दोन गटातील राड्याच्या प्रार्श्वभुमिवर लोणी काळभोर पोलिसांनी लोणी काळभोर गाव व उरुळी कांचन कांचन शहरात गल्लाबोळातुन संचलण केले. यात स्वतः पोलिस निरीक्ष सुरज बंडग, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे व त्याचे सहकारी संचलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी नागरीकांना शांततेत निवडणुक पार पाडण्याबाबत विनंतीही केली.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com