पाण्यासारखा पैसा ओतला...देवांना साकडे घातले...तरीही कोरोनाने तीन भाऊ हिरावून नेले - In fifteen days, three brothers died of corona | Politics Marathi News - Sarkarnama

पाण्यासारखा पैसा ओतला...देवांना साकडे घातले...तरीही कोरोनाने तीन भाऊ हिरावून नेले

संदीप भोरडे
गुरुवार, 6 मे 2021

मात्र नियतीला हे मान्य नव्हते.

गुनाट (जि. पुणे) : शिरूर (Shirur) तालुक्यातील कारेगाव (Karegaon) येथील नवले मळ्यातील तीन सख्या भावांचा पंधरा दिवसांच्या आतच कोरोनाच्या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. पोपट नवले, सुभाष नवले, विलास नवले हे घरातील कर्ते पुरुषच कोरोनारूपी आजाराने हिरावून नेले आहेत. नवले कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (In fifteen days, three brothers died of corona)

याबाबतची माहिती अशी, की कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर पोपट नवले, सुभाष नवले, विलास नवले या तिघाही भावंडांना शिरूर तालुक्यातील विविध खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, 23 एप्रिल रोजी उपचारादरम्यान थोरले बंधू पोपट नवले (वय 58) यांचे निधन झाले, त्यानंतर चारच दिवसांत म्हणजे 27 एप्रिल रोजी सुभाष नवले (वय 55) या मधव्या भावाचे निधन झाले, तर आज (ता. ६ मे रोजी) धाकटा भाऊ विलास नवले (वय 52 ) यांचे निधन झाले. 

हेही वाचा : ...हा तर जमिनी अन॒ ठेवींवर डोळा ठेवून घेतलेला निर्णय : लांडगे, जगतापांचा प्राधिकरण विलिनीकरणास विरोध

गावातील सामाजिक धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग असणारे व शेती हाच व्यवसाय मानून आपल्या कुटुंबांचे उदरनिर्वाह चालणाऱ्या तिघा बंधूंच्या जाण्याने नवले कारेगावकरांना मोठा धक्काच बसला आहे. 

नियती निष्ठूरच 

पोपट नवले यांचे निधन झाल्यानंतर झालेले दु;ख बाजूला सारून त्यांचे दोन्ही भाऊ या आजारातून बरे व्हावेत आणि त्यांचा कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले. उपचारासाठी पाण्यासारखा पैसाही ओतला, देवांना साकडेही घातले. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. पंधरा दिवसांच्या आताच नियतीने तिघाही भावांना हिरावून नेले. 

 
कोरोनाला गांभीर्याने घ्या

ग्रामीण भागात कोरोना आजाराला आजही गांभीर्याने घेतले जात नाही. मास्क न लावणे, सामाजिक अंतर न पाळणे, दुखणे अंगावरच काढणे, क्वारंटाईनचे नियम न पाळणे असे प्रकारे सर्रास पाहायला मिळतात. ग्रामपंचायतही अशा प्रकाराकडे दुर्लक्षच करतात. मात्र या आजाराने अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनो कोरोनाला गांभीर्याने घ्यावे, असेच म्हणायची वेळ आता आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख