लाचखोर डॉक्‍टरवर कारवाई होण्याऐवजी सातव्या दिवशी रुग्णालयात हजर 

आरोग्य विभागाकडून सत्वर कारवाई करण्याऐवजी पाठीशी घालण्याचा गंभीर प्रकार या निमित्ताने पुढे आला आहे.
The doctor who was caught taking bribe in Daund city is in hospital on the seventh day
The doctor who was caught taking bribe in Daund city is in hospital on the seventh day

दौंड (जि. पुणे) : दौंड शहरात मजुरांकडे कोरोना रिपोर्टसाठी लाच स्वीकारताना पकडण्यात आलेला उपजिल्हा रूग्णालयातील डॉ. मिलिंद कांबळे जामिनावर सुटल्यानंतर अवघ्या सातव्या दिवशी रुग्णालयात हजर झाला आहे. आरोग्य विभागाकडून सत्वर कारवाई करण्याऐवजी पाठीशी घालण्याचा गंभीर प्रकार या निमित्ताने पुढे आला आहे. 

दौंड उपजिल्हा रूग्णालयात डॉ. मिलिंद दामोदर कांबळे (वय 38, रा. कात्रज, पुणे) हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. डॉ. कांबळे याने कुरकुंभ एमआयाडीसीमधील रोजंदारीवरील 19 मजुरांकडे कोरोना विषाणू तपासणी अहवाल देण्याकरिता प्रत्येकी शंभर रुपये मागितले होते. एक मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून डॉ. मिलिंद कांबळे यास तडजोडअंती दीड हजार रूपयांची लाच स्वीकारताना पकडले होते. 

एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आल्यानंतर डॉ. कांबळे यास 3 मार्च रोजी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन देण्यात आला होता. 

दरम्यान उपजिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून लाच प्रकरणानंतर आवश्‍यक कारवाई करण्यात दिरंगाई झाल्याने आज (सोमवारी, ता. 8 मार्च) डॉ. कांबळे हा नेहमीप्रमाणे उपजिल्हा रूग्णालयात रूग्णसेवेसाठी हजर झाला होता. लाच प्रकरणात कारवाई होऊनही पुन्हा हजर झाल्याने रूग्णालयातील अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी सखेद आश्‍चर्य व्यक्त केले. तर या प्रकरणातील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली आहे. 

कारवाईची प्रक्रिया सुरू आहे : डॉ. संग्राम डांगे 

उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांना डॉ. कांबळे याच्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ""प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. कार्यमुक्त करा म्हणून पत्र आलेले नाही. त्यांचा (डॉ. कांबळे) अहवाल मागविण्यात आला असून तो आज पाठविला जाईल. आदेश येत नाही तोपर्यंत डॉ. कांबळे ड्यूटीवर असतील.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com