पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी 'वंचित'कडून धनगर समाजाला उमेदवारी 

मते खेचण्याची आंबडेकरांची खेळी कितपत यशस्वी होते, हे पाहावे लागणार आहे.
Dhangar Samaj candidature from vanchit Bahujan Aghadi for Pandharpur by-election
Dhangar Samaj candidature from vanchit Bahujan Aghadi for Pandharpur by-election

अकोला : पंढरपूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा पक्षाचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (ता. 31 मार्च) अकोला येथे पत्रकार परिषदेत केली. धनगर समाजातील वीरप्पा मधुकर मोटे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी धनगर समाजाला उमेदवारी देत मतदारसंघातील या समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. या मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक स्वरूपाची आहेत. तसेच, समाजाच्या बैठकीत ठरल्यानुसार यशवंत सेनेनेही आपला उमेदवार उभा केला आहे, त्यामुळे मते खेचण्याची आंबडेकरांची खेळी कितपत यशस्वी होते, हे पाहावे लागणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके यांचे वर्षभरातच अकाली निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर येत्या ता. 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. 

"वंचित'च्या उमेदवाराची घोषणा बुधवारी (ता. 31 मार्च) अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजातील विरप्पा मोटे यांना उमेदवारी दिल्याने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील चुरस वाढली आहे. 

या मतदारसंघातील धनगर समाज आजपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसची पाठराखण करत आला आहे. मधल्या काळात आक्रमक झालेल्या या समाजाने एक बैठक घेत समाजातील उमेदवार देण्याची मागणी राजकीय पक्षांकडे केली होती. त्यानंतर मात्र यशवंत सेनेच्या माध्यमातून समाजाने आपला उमेदवार उभा केला आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही धनगर समाजाचा असल्याने हे दोन्ही उमेदवार कोणाची मते खाणार? त्याचा फटका कोणाला बसणार आणि कोणाला फायदा होणार? याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. 


हेही वाचा : कल्याण काळे यांच्या तटस्थ भूमिकेमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता 

पंढरपूर : पंढरपूर तालुक्‍याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे हे अजूनही तटस्थ आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीत ते कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. कल्याण काळे हे सध्या महाविकास आघाडी व भाजप या दोन्ही उमेदवारांच्या बैठका व प्रचारापासून अलिप्त आहेत. आगामी काळात काळे कोणती भूमिका घेतात आणि आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतात, हे पाहावे लागणार आहे. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वतः निवडणुकीला सामोरे न जाता, भाजप उमेदवार, उद्योजक समाधान आवताडे यांच्या मागे आपली शक्ती उभी केली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपत आलेले कल्याण काळे व त्यांचे कार्यकर्ते पोटनिवडणुकीपासून चार हात लांब आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात आणखी अस्वस्थता वाढली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com